Home शहरं पुणे pune news News : Coronavirus in Pune पुणे करोनाच्या विळख्यात; रुग्णसंख्येने गाठला...

pune news News : Coronavirus in Pune पुणे करोनाच्या विळख्यात; रुग्णसंख्येने गाठला ४ महिन्यांतील उच्चांक – pune district records highest single-day spike of 1251 new covid 19 cases


पुणे : करोना चाचण्यांच्या संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडल्याने पुण्यासह जिल्ह्यातील रुग्णसंख्येनेदेखील बुधवारी उच्चांक गाठला. शहर व जिल्ह्यात बुधवारी १२५१ रुग्ण आढळल्याने गेल्या चार महिन्यांतील ही सर्वांत मोठी रुग्णसंख्या ठरली. त्यात एकट्या पुण्यात ८६० जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील धोका वाढू लागल्याचे स्पष्ट होत आहे. ( Coronavirus in Pune )

वाचा: अंत्यसंस्काराला गेलेल्या ६ जणांना करोना; अहवाल वेळेत आला असता तर

पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढली असली, तरी बुधवारी एका दिवसात ५८९ रुग्ण बरे झाले आहेत. ३४७ रुग्ण गंभीर असून, शहर व जिल्ह्यात २५ जणांचे मृत्यू झाले आहेत. पुण्यात बुधवारी ४ हजार ६८ रुग्णांची चाचणी केली गेली. आतापर्यंत चाचण्यांची संख्या १ लाख २० हजार ५८ इतकी झाली आहे.

पुण्यात बुधवारी आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले. ८६० जणांना पुण्यात तर पिंपरी चिंचवड मध्ये २८२ व पुणे ग्रामीणमध्ये ६४ जणांना करोनाची लागण झाली. तसेच पुणे कँटोन्मेंटसह नगरपालिका हद्दीत ४५ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील रुग्णसंख्या १८ हजार १५६ तर जिल्ह्याची रुग्णसंख्या २३ हजार ६८० एवढी झाली आहे.

वाचा: मुंबईतील सलून, मंगल कार्यालयांसाठी ‘हे’ आहेत नवे नियम

पुण्यात बुधवारची स्थिती

पुणे पालिका नवीन रुग्ण : ८६०
पिंपरी-चिंचवड नवीन रुग्ण : २८२
पुणे कँटोन्मेंट नवीन रुग्ण : ४५
पुणे ग्रामीण नवीन रुग्ण : ६४
बुधवारी बरे झालेले रुग्ण : ५८९
बुधवारचे मृत्यू : २५
एकूण पॉझिटिव्ह : २३६८० (पुणे शहर : १८१५६, पिंपरी-चिंचवड : ३५८२, पुणे ग्रामीण : ९३१, पुणे कँटोन्मेंट आणि जिल्हा रुग्णालय १०११)

वाचा: पुण्यात पुन्हा लॉकडाऊन? जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments