Home शहरं पुणे Pune Police: पोलिसानंच घेतली डॉक्टरांकडून तब्बल सात लाखांची खंडणी - police officers...

Pune Police: पोलिसानंच घेतली डॉक्टरांकडून तब्बल सात लाखांची खंडणी – police officers take ransom from doctor in pune


पुणेः शहर पोलिस दलातील एका पोलिसासह आठ जणांवर डॉक्टरकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणात (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. कोर्टाने संबंधित पोलिसाचा जामीन अर्ज गुरुवारी फेटाळला.

समीर जगन्नाथ थोरात (वय ३२, रा. स्वारगेट पोलिस लाईन) असे या पोलिसाचे नाव आहे. थोरात याच्या जामीनावर गुरुवारी कोर्टात सुनावणी होती. संबंधित टोळीतील आठ जणांवर मोकानुसार कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली. या प्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्य गुन्हा दाखल आहे.

जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात बुडून पाच जणांचा मृत्यू

हडपसर येथील एका डॉक्टरला गर्भलिंग तपासणी करतो, असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून सात लाख रुपये खंडणी उकळण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत जार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात पोलिस कर्मचारी समीर थोरात, तोतया पत्रकार प्रदीप फासगे, सामाजिक कार्यकर्ता कैलास ऊर्फ भागूदास अवचिते आणि आरती चव्हाण यांचा समावेश आहे. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार रंजना वणवे, सागर राऊत, महेश पवार, किरण माकर (सर्व रा. बारामती) हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी ही कारवाई केली.

वाचाः एखादाच माझ्या सारखा असतो त्याला मरण नसतंः उदयनराजे भोसले

पोलिस कर्मचारी थोराततर्फे जामीन मिळावा म्हणून अॅड. ठोंबरे यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. आरोपीविरुद्ध यापूर्वी एकही गुन्हा नसल्याने त्याला मोक्का कायदा लागू होत नाही. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अॅड. ठोंबरे यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajasthan Royals: IPL 2020: धोनीच्या चेन्नईची हाराकिरी, राजस्थानने साकारला मोठा विजय – ipl 2020: rajasthan royals beat chennai super kings by 7 wickets

अबुधाबी, IPL 2020 : चेन्नईच्या फलंदाजांना आजच्या सामन्यात सूर गवसला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक...

Varun Gandhi: मदत मागणाऱ्यावर वरुण गांधी खवळले!; म्हणाले, ‘मी काय तुमचा नोकर नाही’ – bjp pilibhit mp varun gandhi viral audio illegal liquor case...

पिलीभीतः उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी ( varun gandhi ) यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. या कथित व्हायरल...

Recent Comments