Home शहरं पुणे Pune Satara Road: सातारा रस्त्याचे काम मार्गी-गडकरी - pune satara road work...

Pune Satara Road: सातारा रस्त्याचे काम मार्गी-गडकरी – pune satara road work route


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-सातारा महामार्गाच्या सहापदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक शंभर-सव्वाशे कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) एस्क्रो खाते काढून संबंधित कंत्राटदारांच्या उप कंत्राटदारांना उपलब्ध करून दिले जातील आणि हे काम तातडीने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्र जनसंवाद रॅलीत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी गडकरी यांनी पुणे-सातारा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून जनतेची नाराजी स्वीकारावी लागल्याची कबुली दिली. ‘हा रस्ता पूर्ण करण्यासाठी जे शंभर-सव्वाशे कोटी रुपये लागतील, ते उपलब्ध करून द्यावेत असे आदेश आठ दिवसांपूर्वी ‘एनएचएआय’च्या संचालकांना दिले आहेत. एस्क्रो खाते काढून संबंधित कंत्राटदाराच्या उपकंत्राटदारांना हे पैसे दिले जाणार आहेत आणि त्यांच्याकडून हा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची जबाबदारी प्रकल्प संचालकांवर दिली आहे,’ असे त्यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा मार्गाच्या चौपदरीकरणाची कामे लवकरच सुरू होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विविध रस्त्यांच्या कामासाठी राज्याला पाच लाख कोटी रुपये दिल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले.

सुरत-अहमदनगर ग्रीन फील्ड कॉरिडॉरची घोषणा

या वेळी नितीन गडकरींनी सुरत ते अहमदनगर आणि सोलापूर ते कर्नुल या दोन नव्या ग्रीन फील्ड कॉरिडॉर रस्त्यांची घोषणाही केली. सुरत-अहमदनगर या ४२१ किलोमीटरच्या मार्गामुळे सुरतहून बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नईकडे जाणारी वाहतूक नगरमार्गे वळेल. त्यामुळे सुरत-मुंबई, मुंबई-पुणे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गडकरी म्हणाले,

– भाजपला बहुमत मिळाल्यानेच कलम ३७० हे गुलामगिरीचे प्रतीक संविधानातून काढता आले.

– करोनाविरोधी लढाईत काही डबल ढोलकी राजकारण करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.

– साखर कारखान्यांनी साखर नाही, इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा.

– काँग्रेस-राष्ट्रवादीची सडत पडलेली सिंचन स्मारके पुनरुज्जीवीत करण्याचे काम आम्ही केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus updates: US, फ्रान्समध्ये करोनाचा कहर: आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण – coronavirus updates us and france reports highest coronavirus cases daily figure since...

वॉशिंग्टन/पॅरिस/लंडन: करोनावर नियंत्रण मिळवत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत असले तरी दुसरीकडे परिस्थिती बिघडत असल्याचे चित्र आहे. अमेरिकेत एकाच दिवसांत जवळपास...

aurangabad recovery rate: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोचले ९१ टक्क्यांवर – aurangabad corona update : corona patient’s recovery rate reached 91 percent

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद शहरात करोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९१ टक्क्यांवर येऊन पोचले आहे. २५ हजार ४१ रुग्णांपैकी २२...

Recent Comments