Home शहरं पुणे Pune Suicide: पुण्यात मंडप डेकोरेटरनं गळफास घेऊन केली आत्महत्या - pune suicide...

Pune Suicide: पुण्यात मंडप डेकोरेटरनं गळफास घेऊन केली आत्महत्या – pune suicide 45 year old man hangs himself in dhayari


म. टा. प्रतिनिधी, पुणे : नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड) परिसरातील धायरी येथे एका मंडप डेकोरेटरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार (१९ जून) पहाटे २ ते ६ दरम्यान घडली. मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

स्वप्निल उत्तम रायकर (४५ वर्षे रा. शिव मल्हार नगर, रायकर मळा, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या मंडप डेकोरेटरचे नाव आहे. स्वप्नील यांचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय आहे. त्यांनी घरातील किचनमध्ये छताच्या हुकला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, अशी माहिती सिंहगडरस्ता पोलिसांनी दिली.

दरम्यान, रायकर यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रुस्तम शेख हे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, पुण्यातील सुखसागर नगर परिसरातील गल्ली क्रमांक १ येथे राहणाऱ्या कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज पहाटे उघडकीस आला होता. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या मुलांची हत्या केल्यानंतर त्यांनी गळफास गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Navale Bridge: पुण्यात नवले पुलाजवळ इतके अपघात का होतात?; कारण सापडलं! – various works are underway to prevent accidents near navale bridge

हायलाइट्स:नवले पुलाजवळील अपघात का होतात, याचे झाले सर्वेक्षण.तीव्र उतारावर जड वाहने बंद करून चालवली जात असल्याचे उघड.अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर हाती घेतली कामे.पुणे: पुण्यातीलनवले...

pune girl death case: pune girl death case : पुण्यातील ‘त्या’ तरुणीच्या मृत्यूच्या बातम्यांविषयी उच्च न्यायालयाचे निर्बंध – high court restrictions on media trial...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः पुण्यात मागील महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तरुणीचा झालेला मृत्यू ( pune girl death case )...

Recent Comments