Home शहरं पुणे Pune Suicide: Pune Suicide अकाउंटंट तरुणीची आत्महत्या; भावाला बाहेरून कुलुप लावायला सांगितलं...

Pune Suicide: Pune Suicide अकाउंटंट तरुणीची आत्महत्या; भावाला बाहेरून कुलुप लावायला सांगितलं होतं! – 25 year old accountant committed suicide in pune


पुणे: नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील धायरी येथे एका २५ वर्षीय तरुणीने शुक्रवारी आत्महत्या केली. बेडरूम मधील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ( Pune Suicide )

माधुरी तानाजी जगदाळे ( २५ वर्षे, रा. गणेश नगर, उंबऱ्या गणपती जवळ, धायरी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी घरात एकटीच होती. तिची आई सकाळी दहा वाजता कामाला जाते व संध्याकाळी पाच वाजता कामावरून येते. तिचा भाऊ दुपारी कामास जात असताना तिने त्याला घराला बाहेरून कुलुप लावून जा, आई कामावरून आल्यावर कुलुप उघडेल असे सांगितले, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत सिंहगड रोड पोलिसांनी दिली.

या तरुणीची आई संध्याकाळी कामावरून घरी आली असताना बेडरूम मधील पंख्याला माधुरीने गळफास घेतल्याचे दिसले. तिच्या आईने व भावाने तिला खाली काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ही तरुणी एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती. पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद केली आहे. पोलिस हवालदार रुस्तम शेख पुढील तपास करत आहेत.

आणखी वाचा:ऑनलाइन टीव्ही विकायला गेला; ३९ हजार गमावून बसला
लॉकडाउनचा बळी, आर्थिक चणचणीतून सलून चालकाची आत्महत्याSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai Metro News: पहिलीच स्वदेशी मेट्रो २७ जानेवारीला मुंबईत – first Indigenous Metro Will Be In Mumbai On 27 January | Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईलाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील, स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे...

Recent Comments