Home शहरं पुणे pune water stock: Pune Water Stock पुण्यावर पाणीसंकट; ११ धरणांनी गाठला तळ,...

pune water stock: Pune Water Stock पुण्यावर पाणीसंकट; ११ धरणांनी गाठला तळ, हे धरण झालं कोरडंठाक – pune water stock of 11 dams down over poor rainfall


पुणे: पावसाने ओढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील २३ धरणांपैकी अकरा धरणांतील पाण्याने तळ गाठला असून, पिंपळगाव जोगे हे धरण पूर्ण रिकामे झाले आहे. पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये अवघे ५.६५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ( Pune Water Stock )

निसर्ग ’ चक्रीवादळामुळे सलग दोन ते तीन दिवस धरणांमध्ये पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. पिंपळगाव जोगे या धरणामध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. या धरणासह अकरा धरणांतील पाणी तळाला गेले आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी टेमघर धरण हे दुरुस्तीच्या कामासाठी रिकामे आहे. उर्वरित तीन धरणांपैकी वरसगाव धरणात १.९६ टीएमसी, पानशेत धरणात २.३८ टीएमसी आणि खडकवासला धरणात १.१८ टीएमसी पाणीसाठा राहिला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

वाचा: जूनचे वीजबिल हप्त्याने भरण्याची सवलत!

पिंपळगाव जोगे या धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. माणिकडोह या धरणामध्ये अवघे ०.३६ टीएमसी पाणी आहे. याशिवाय येडगाव धरणात ०.६३ टीएमसी, वडज धरणात ०.१५ टीएमसी, घोड धरणात ०.४१ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे. विसापूर धरणामध्ये ०.२५ टीएमसी, कळमोडी धरणात ०.०९ टीएमसी, चासकमानमध्ये ०.६५ टीएमसी, वडीवळे धरणामध्ये ०.२१ टीएमसी, कासारसाई धरणात ०.१९ टीएमसी आणि नाझरे धरणात ०.११ टीएमसी पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

उजनीतील उपयुक्त जलसाठा संपला

सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात काठोकाठ भरले होते. मात्र, सध्या या धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. या धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ५३.५७ टीएमसी आहे. हे सर्व पाणी संपले असून, उपयुक्त पाणीसाठ्याचे प्रमाण उणे १०.०८ झाले असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

वाचा: राज्यात २८ जूनपासून पुन्हा सलून सुरू होणार, फक्त केसच कापणार!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

नगरमध्ये वेगळंच राजकारण! विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी भाजप नेत्याच्या मुलाची मोर्चेबांधणी – former mp dilip gandhi’s son bats for shiv sena leader candidate

हायलाइट्स:अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत वेगळंच राजकारणभाजपच्या माजी खासदाराच्या मुलाची शिवसेनेच्या दिवंगत नेत्याच्या मुलासाठी मोर्चेबांधणीश्रीपाद छिंदम याला अपात्र ठरविल्यानं होतेय पोटनिवडणूकअहमदनगर: नगरमध्ये एकमेकांचे पारंपरिक विरोधक...

Coronavirus In India: Coronavirus : देशात एका दिवसात १६,८३८ रुग्णांची भर तर १३ लाखांचं लसीकरण – covid 19 cases update in india 16838 new...

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत एकूण १६ हजार ८३८ नवे करोना संक्रमित रुग्ण आढळले२४ तासांत ११३ नागरिकांनी गमावला जीवएकाच दिवशी देशभरात १३ लाख ८८ हजार...

taapsee pannu and anurag kashyap news: ‘कलाकारांची चौकशी करण्याचा अधिकार, पण…’ – sanjay raut on income tax raids on taapsee pannu and anurag kashyap

हायलाइट्स:शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणातापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या चौकशीवरुन राऊतांची टीकाअभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलू नये म्हणून दडपण आणलं जात आहेमुंबईः...

Recent Comments