Home शहरं मुंबई Quarantine Centre: quarantine centre: बिल्डर उदार झाला; क्वॉरंटाइन सेंटरसाठी आख्खा १९ मजली...

Quarantine Centre: quarantine centre: बिल्डर उदार झाला; क्वॉरंटाइन सेंटरसाठी आख्खा १९ मजली टॉवर दिला – mumbai: a builder converts 19 floor building in quarantine centre


मुंबई: संपूर्ण शहरातील करोनाचा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. रुग्णांसाठी बेड्स कमी पडू नयेत म्हणून ठिकठिकाणी क्वॉरंटाइन सेंटर उभारले जात असून खासगी रुग्णालयेही ताब्यात घेतले जात असतानाच एका बिल्डरने क्वॉरंटाइन सेंटरसाठी चक्क नुकतीच तयार झालेली गगनचुंबी इमारत दिली आहे. या इमारतीतील सर्वच फ्लॅटमध्ये करोना रुग्णांना ठेवण्यात आले आहे. एक छदामही न घेता या बिल्डरने महापालिकेला इमारत दिल्याने त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मेहुल सिंघवी असं या बिल्डरचं नाव आहे. त्यांची श्रीजी शरण डेव्हल्पर्स ही कंपनी असून मालाड येथे त्यांनी श्रीजी पॅराडाइस नावाची १९ मजली इमारत बांधली आहे. ही इमारत नुकतीच बांधून तयार झाली असून इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रासह पालिकेच्या इतर सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. या १९ मजली इमारतीत एकूण १३० फ्लॅट्स आहेत. यातील बहुतेक फ्लॅट्स विकण्यात आले असून काही फ्लॅट्स भाड्याने देण्यात आले आहेत. मात्र मालाड, कांदिवली, गोरेगाव आणि जोगेश्वरी परिसरात करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने या बिल्डरने ही संपूर्ण इमारत पालिकेला क्वॉरंटाइन सेंटरसाठी दिली. या बिल्डरने भाडोत्री आणि फ्लॅटधारकांना इतर ठिकाणी काही काळासाठी भाड्याने राहण्याकरिता स्वत:च्या खिशातून पैसे देऊन पालिकेला कोणताही मोबदला न घेता इमारत दिली आहे. सिंघवी यांचं हे औदार्य पाहून पालिकेनेही त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं आहे. सध्या या इमारतीत एकूण ३०० रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.

अंधारातून प्रकाशाकडे… वादळग्रस्त लेप गावानं घालून दिला नवा आदर्श

देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ही संकटाची वेळ आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जेवढं काही करता येईल तेवढं करावं ही आपली जबाबदारी आहे. स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी या इमारतीचा करोना रुग्णांसाठी वापर करता येईल, असा सल्ला मला दिला आणि त्यांचा सल्ला मी लगेच मानला. मी आज जे काही करू शकलो, त्याचं सर्व श्रेय गोपाळ शेट्टी यांना जातं, असं सिंघवी यांनी सांगितलं.

करोना बळी ठरलेल्या पोलिसांना ‘हुतात्मा’ मानायचे का?; संभ्रम कायम

या संकटाच्या काळात लोक वैयक्तिगत हित सोडून समाजासाठी काम करत आहेत, याचं मला समाधान आहे. सर्वांनीच असं योगदान दिलं तर आपण आपले प्राण वाचवू शकू, त्यासाठी प्रत्येकानं पुढं यायला हवं, असं गोपाळ शेट्टी म्हणाले. तर करोना सेंटर आणि रुग्णालयासाठी आम्हाला ही इमारत देण्यात आली आहे. जनतेने असंच सहकार्य केलं तर आम्ही रुग्णांना अधिक चांगली सुविधा देऊ शकतो, असं पालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय कबरे यांनी सांगितलं.

Live: राज्यात आतापर्यंत ६२ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्तSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bjp vs ncp clash in sangli: BJP vs NCP: सांगलीत भाजप-राष्ट्रवादीचं जीवघेणं राजकारण; ग्रामपंचायतीच्या दारात सदस्याचा बळी – clashes between bjp and ncp in...

हायलाइट्स:उपसरपंच निवडीवरून भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हाणामारीमारहाणीत राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू.कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील धक्कादायक घटना.सांगली:सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे उपसरपंच निवडीच्या वादातून भाजप...

Recent Comments