Home शहरं अहमदनगर radhakrishna vikhe-patil: विखे-पाटलांनी कामाची पद्धतच बदलली; 'या' पुस्तिकांचे केले वाटप - vikhe-patil...

radhakrishna vikhe-patil: विखे-पाटलांनी कामाची पद्धतच बदलली; ‘या’ पुस्तिकांचे केले वाटप – vikhe-patil changed style of working in ahmednagar


म. टा. प्रतिनिधी, नगर

पक्षीय यंत्रणा न जुमानता आपली स्वतंत्र राजकीय ओळख कायम ठेवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या विखे-पितापुत्रांनी आता आपली पद्धत बदलण्याचे ठरविल्याचे दिसून येते. आता ‘शतप्रतिशत भाजप’ चे काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतल्याचे दाखवायला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गेल्या आठवड्यात भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कामगिरीची पुस्तिका वाटताना दिसून आले. तर त्यांचे पुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आता विखे गट नावाचा कोणताही गट राहिला नसून विखे म्हणजेच भाजप झाल्याने अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी दूर रहावे, अशी घोषणाच करून टाकली.

वाचा: घरच्या कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही; चव्हाणांचा पवारांना टोला

काही दिवसांपूर्वी विखे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात संघर्ष झाला होता. त्यामध्ये लाचारी, पक्षनिष्ठा वगैरे मुद्द्यांवरून आरोप प्रात्यारोप झाले होते. त्यानंतर विखे यांच्या राजकारणाच्या पद्धतीत काही बदल झाल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. स्वत: विखे यांनी शिर्डी मतदारसंघात पक्षाची पुस्तिका वाटली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच विखेंनी श्रीरामपूरमध्ये आपले वैयक्तिक संपर्क कार्यालय सुरू केले होते. त्यावर पक्षाचा कोठेही उल्लेख केला नव्हता. विखे हाच ब्रँड आहे, असे त्यांच्याकडून सांगितले जात असे. त्यामुळे कोणत्याही पक्षात असले तरी ‘जिल्हा विकास आघाडी’, ‘विखे यंत्रणा’सारख्या बॅनरखाली त्यांचे काम सुरू असते. या माध्यमातून सर्वपक्षीय कार्यकर्ते जोडले जातात. आता मात्र यामध्ये लक्षणीय बदल करण्याचे त्यांनी ठरविल्याचे दिसून येऊ लागले आहे.

पिचड पिता-पुत्रांच्या मनात काय?; वडिलांनंतर मुलानंही केलं पवारांचं कौतुक

विखे यांच्या कृतीनंतर खासदार सुजय विखे यांनी तर मंगळवारी नगरमध्ये पत्रकार परिषदेतच यासंबंधीची घोषणा केली. ते म्हणाले, ‘आपल्याला खासदार म्हणून निवडून येण्यास सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी मदत केली. त्यातील अनेक मंडळी आपल्या मूळ पक्षात कार्यरत असूनही आपल्यासोबत कायम असतात. त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर यापुढेही प्रेम राहील. मात्र, राजकीय कार्यक्रमात या लोकांनी आता आमच्यापासून दूर रहावे. केवळ भाजपमध्ये असलेल्या लोकांनीच सोबत यावे. यापुढे आमच्या राजकारणात कोणताही गट नाही. विखे गट म्हणजेच भाजप आहे. यापुढे याच पद्धतीने काम केले जाणार आहे. भाजपमधील सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल.’

वाचा: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कामकाजात मराठीच हवी!

विखे पिता-पुत्रांची ही भूमिका केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी विखेंनी पाडापाडी केल्याचा आरोप भाजपमधील पराभूत आमदारांनी केला होता. त्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. समितीचे कामकाज पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते मात्र, अहवाल आणि निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे स्थानिक भाजपामध्ये विखेंविरोधातील वातावरण मनापासून थांबलेले नाही. विखे ज्या पक्षात जातात, त्या पक्षात ते वेगळी चूल मांडून काम करतात, असा त्यांच्यावर विरोधकांचा आरोप नेहमीच असतो. हा त्यांच्या राज्यातील प्रतिमेसाठीही मारक ठरत आहे. आतापर्यंत त्यांनी हे सर्व रेटून नेलेले दिसून येत होते. आता मात्र, त्यांनी आपल्या भूमिकेत किंचित बदल केल्याचे दिसून येते. बिनधास्त वक्तव्य करून आपण कोणत्याही पक्षाला बांधिल नाही, असे सांगणारे त्यांचे पुत्र डॉ. सुजय सुद्धा आता भाजपला बांधिल असल्याची भूमिका मांडू लागले आहेत. हा बदल त्यांनी स्वत: करून घेतला की पक्षातील ज्येष्ठांकडून काही सूचना किंवा संकेत आले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

'तुका माझा बाप, माझं कबीराचं कूळ'

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद देशातील सद्यस्थिती ते सामान्यांची ससेहोलपट कवितेतून चितारणारे मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष रंगले. 'तुका माझा बाप, माझं कबीराचं कूळ' असे...

virat kohli: विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत गौतम गंभीरने केली सणसणीत टीका, म्हणाला… – indian former cricketer gautam gambhir ask question over virat kohli’s captaincy

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला विराट कोहलीकडे दिलेल्या कर्णधारपदाबाबत चांगलाच वाद सुरु आहे. आता भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरनेही कोहलीवर सणसणीत...

Anna Hazare: फडणवीसही रिकाम्या हाताने परतले!; अण्णांनी केंद्राला दिला ‘हा’ निरोप – devendra fadnavis meets anna hazare at ralegan siddhi

नगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारीपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांचे पत्र घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र...

Recent Comments