Home देश पैसा पैसा raghuram rajan : दीर्घकाळ लॉकडाऊन परवडणारं नाही; अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्या : रघुराम...

raghuram rajan : दीर्घकाळ लॉकडाऊन परवडणारं नाही; अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्या : रघुराम राजन – raghuram rajan expect goverment should focus of economy restoration


मुंबई : करोनामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी आता सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डाॅ. रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. दीर्घकाळ लाॅकडाऊन भारताला परवडणारे नाही. सरकारने आता जीवनावश्यक गरजा भागवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊननंतर घर घेण्यासाठी सुवर्णसंधी?

केंद्र सरकारने २१ दिवसांचा लाॅकडाऊन दुसऱ्यांदा वाढवला आहे. ३ मे रोजी लाॅकडाऊनची मुदत संपुष्टात येणार आहे. करोनाचा वाढता प्रसार देशासाठी धोकादायक आहे. करोना रोखण्यासाठी सरकारने लाॅकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला आहे. मात्र त्यामुळे आर्थिक विकासाला फटका बसला आहे. कोट्यवधी लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे राजन यांनी सांगितले. आता परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी सरकारसमोर मोठं आव्हान असेल, असे त्यांनी सांगितले.

बिल्डर नरमले : फ्लॅटवर डिस्काउंट, ग्राहकांना संधी

आता सरकारने अर्थचक्राला गती देण्याचे काम तातडीने केले पाहिजे. अर्थव्यवस्थेची खालावलेली तब्येत सुधारण्यासाठी पावले उचलावीत. आर्थिक मदतीचे पॅकेज देताना सरकारने जागरुक राहिलं पाहिजे, असेही राजन यांनी स्पष्ट केले. पॅकेजमुळे चलनाला झळ पोहचता कामा नये तसेच व्याजदर देखील वाढता कामा नये, असे राजन यांनी स्पष्ट केले आहे.

प्लेसमेंट होऊनही IITins ची धाकधूक; अजूनही ऑफर नाही

देशातील प्रत्येकाला सार्वभौम असल्याचा अनुभव आला पाहिजे, त्यादृष्टीने सरकारने दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. गरीबांना सोयीसुविधा उपलब्ध करणे फार अवघड नाही, असे राजन यांनी सांगितले. सध्याच्या स्थितील वित्तीय तूट वाढेल. काही हरकत नाही, मात्र सध्याची विस्कटलेली घडी मध्यम कालावधीत ठीक करता येईल अशी हमी सरकारने द्यायला हवी.

दीर्घकाळ सुरु असलेल्या टाळेबंदीने लघु आणि मध्यम उद्योजक मरणपंथाला पोहचले आहेत. या उद्योगांना जगवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. सरकारने आता अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवायला हवा, अशी अपेक्षा राजन यांनी व्यक्त केली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना ‘त्याने’ कारमधून मालेगावात सोडले आणि… – jameel shaikh death shooters went to malegaon in...

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शाहिद लायक शेख (३१) या आरोपीला...

Recent Comments