Home देश Rahul Gandhi: मोदींच्या 'मन की बात'वर राहुल गांधी यांचा निशाणा, म्हणाले... -...

Rahul Gandhi: मोदींच्या ‘मन की बात’वर राहुल गांधी यांचा निशाणा, म्हणाले… – rahul gandhi asks modi government about national security and about protection ahead of pm narendra modis mann ki baat


नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावर टिप्पणी केली आहे. राष्ट्ररक्षण आणि सुरक्षेची ‘बात’ कधी होणार, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत विचारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमात देशातील जनतेला संबोधित केले.

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती. संपूर्ण देशाला सत्य काय आहे हे ऐकायचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. देशात वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरूनही त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरले होते. मोदी सरकारने करोनाची साथ आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती अनलॉक केलेल्या आहेत, असे एका ट्विटमध्ये राहुल म्हणाले होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारला जोरदार हल्लाबोल करत ट्विटद्वारे विविध प्रश्न विचारत आहेत. लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक घटनेत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर सैनिकांच्या हौतात्म्यावर राहुल गांधी यांनी सतत प्रश्न विचारत आहेत. दरम्याच्या काळात त्यांनी शनिवारी पुन्हा करोना विषाणूच्या संसर्गाबाबत प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. करोनाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरताना केंद्र सरकारकडे करोनाशी दोन हात करण्यासाठी कोणतीही योजना नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

करोना विषाणूचा संसर्ग तीव्र गतीने होत असून देशातील नव्या भागांमध्ये देखील हा संसर्ग पसरत चालला आहे. भारत सरकाकडे या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी कोणतीही योजना नाही. पंतप्रधानांनी मौन धारण केले आहे. त्यांनी करोना साथीपुढे शरणागती पत्करली आहे आणि करोनाशी लढण्यास इन्कार केला आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या पाच लाखांहून अधिक झालेली असताना राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

‘करोना’शा लढताना अर्थचिंता

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद करोना विषाणू संसर्गाशी लढा देताना पायाभूत सुविधा, मनुष्यबळाप्रमाणे निधीचीही गरज आहे, पण गेल्या सात महिन्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि...

Nashik News : ‘ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा’ – caste based obc census should be conducted

म. टा. वृत्तसेवा, कळवणमराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये. त्यामुळे राज्यातील संपूर्ण ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात...

Shirdi Saibaba Temple: Saibaba Temple: साईचरणी ९ दिवसांत कोट्यवधींचे दान; सहा देशांचे चलनही तिजोरीत! – saibaba temple gets rs 3 crore donations in 9...

नगर: राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्या पासून (१६ नोव्हेंबर) ते काल, मंगळवारपर्यंत सुमारे ४८ हजार...

Recent Comments