Home देश Rahul Gandhi: राजस्थानमधील काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधी पुन्हा होणार अध्यक्ष? - congress...

Rahul Gandhi: राजस्थानमधील काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधी पुन्हा होणार अध्यक्ष? – congress conclave may be held in rajasthan to reinstall rahul gandhi as congress chief


नवी दिल्लीः नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत असलेल्या काँग्रेस पक्षाची सूत्रे पुन्हा एकदा राहुल गांधी ( rahul gandhi ) यांच्या हाती जातील. राजस्थानमध्ये फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसचे अधिवेशन बोलवले जाऊ शकते. हे अधिवेशन नीमराणा किंवा जैसलमेरमध्ये होऊ शकते. याच अधिवेशनात राहुल गांधी पुन्हा पक्षाचे अध्यक्ष होतील, असं सूत्रांनी सांगितलं.

राहुल गांधी १६ डिसेंबर २०१७ ते १० ऑगस्ट २०१९ पर्यंत कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या नेत्यांना राहुल गांधींना राजीनामा न देण्याचं आवाहन केलं होतं. पण राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम होते.

सोनियांच्या मंजुरीनंतर लवकरच अधिवेशन बोलावणार

काँग्रेस निवडणूक समितीने पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना अधिवेशन बोलावण्याकरता वेळ आणि ठिकाण निश्चित करण्याचं आवाहन केलं आहे. यासह निवडणुकीत सहभागी झालेल्या एआयसीसी सदस्यांची यादीही निश्चित करण्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. सोनियाच्या मंजुरीनंतर लवकरच काँग्रेस अधिवेशनाचे ठिकाण आणि वेळ निश्चित होईल, असं वृत्त एका हिंदी वेबसाइटने दिलं आहे.

जवळपास दोन महिन्यांपूर्वी गुलाम नबी आझाद यांच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नावर उपस्थित केले होते. पंचतारांकित संस्कृतीने निवडणुका जिंकता येत नाहीत. राजकारण्यांमध्ये आज एक समस्या आहे की उमेदवारी मिळाली की ते प्रथम फाइव्ह स्टार हॉटेल बुक करतात. रस्ता खराब असेल तर ते त्यावरू जाणार नाहीत. पण ही संस्कृती सोडल्याशिवाय कोणतीही निवडणूक जिंकता येणार नाही, असं आझाद म्हणाले होते. गेल्या ७२ वर्षात काँग्रेस सर्वात खालच्या स्तरावर आहे. गेल्या दोन कार्यकाळात काँग्रेसकडे लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदही नाहीए.

काँग्रेस नेत्यांचे सोनियांना पत्र

काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांनाही या विषयावर पत्र लिहिले होते. यामध्ये कपिल सिब्बल यांच्यासह गुलाम नबी आझाद यांचा समावेश होता. पक्ष संघटनेत बदल आणि पूर्णवेळ पक्षाध्यक्ष हवा, अशी मागणी केली होती.

धक्कादायक! शेतकरी आंदोलनाशीसंबंधित नेत्यासह एका पत्रकाराला NIAचे समन्स

काँग्रेस कृषी कायद्यांविरोधात आक्रमक

काँग्रेस कृषी कायद्यांविरोधात आक्रमक आहे. राहुल आणि प्रियांका गांधी यांनी दिल्लीतील नायब राज्यपालांच्या बंगल्याला घेराव घातला होता. यानंतर, जंतर-मंतर येथे पंजाबमधील शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनातही काँग्रेसचा सहभाग होता.

‘समितीचे सदस्य कृषी कायद्यांचे समर्थक, त्यांना हटवा’, सुप्रीम कोर्टात शेतकरी संघटनांची मागणी

आता काँग्रेसने कृषी कायद्याची माहिती सर्वसामान्यांच्या भाषेत देण्याची तयारी करत आहे. कृषी कायद्यासंबंधी पुस्तिका देण्याची तयारीही कॉंग्रेसने केली आहे. ही पुस्तिका अनेक भाषांमध्ये असेल. राहुल गांधी १८ जानेवारीला दिल्लीत पत्रकार परिषदेत ही पुस्तिका जारी करतील, अशी चर्चा आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sitaram Kunte: अनुभवी आणि विश्वासार्ह : सीताराम कुंटे – sitaram kunte new chief secretary of maharashtra

अखेर सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव झाले. खरेतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच ते मुख्य सचिवपदी येणार असा अनेकांचा कयास होता.  Source...

Corona Rules Violation: करोनाबाधित नियमांचा भंग करून फिरत होता घराबाहेर; गुन्हा दाखल – police file fir against corona positive man for corona rules violation

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनास रोखण्यासाठी मुंबईत लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गोवंडी पोलिस ठाण्यापाठोपाठ सोमवारी चेंबूर पोलिस ठाण्यात...

Recent Comments