Home देश rahul gandhi made remarks: 'तू इधर उधर की बात न कर...'; राहुल...

rahul gandhi made remarks: ‘तू इधर उधर की बात न कर…’; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा – rahul gandhi made the remarks after prime minister narendra modis address to the nation


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनावर प्रसिद्ध शायर शहाब जाफरी यांच्या ओळींचा आधार घेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘तू इधर उधर की न बात कर, ये बता कि काफिला कैसे लुटा, मुझे रहजनों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है’ (तू इकड-तिकडच्या गोष्टी करू नकोस, हे सांग की हा काफिला कसा काय लुटला गेला?…. मला दरोड्याबाबत आक्षेप तर आहेच, मात्र तुझ्या मार्गदर्शनावर सवाल आहे) या ओळी ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशाचा अपेक्षाभंग करत भलत्याच मुद्दयाला हात घातल्याकडे उं अंगुली निर्देश करत मोदींच्या भाषणाचा निषेध केला आहे.

राहुल गांधी यांनी कवी शहाब जाफरी यांच्या ‘तू इधर उधर की न बात कर, ये बता कि क़ाफ़िला क्यूँ लुटा; मुझे रहज़नों से गिला नहीं, तिरी रहबरी का सवाल है’ या ओळींचा आधार घेत पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर निशाणा साधला आहे. या ओळींमध्ये काही शब्दांचा काहिसा बदल करत पंतप्रधान मोदी देशापुढील समस्यांवर बोलायचे टाळून भलत्याच विषयावर बोलत असल्याकडे राहुल गांधी यांनी इशारा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधन होण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून करत असलेल्या संबोधनातून या प्रश्नांची उत्तरे देतील अशी राहूल गांधी यांनी अपेक्षा केली होती हे स्पष्ट आहे. मात्र मोदी यांनी आपल्या अपेक्षेप्रमाणे भाषण केले नसल्याचे कवितेच्या या ओळी ट्विट करत राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे.

वाचा: ‘मोदी विरुद्ध मनमोहन’; चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधीनी काढले ‘हे’ अस्त्र

संपूर्ण देश जाणतो की चीनने भारताच्या पवित्र जमिनीवर कब्जा केला आहे. चीनने घेतली. लडाखमध्ये ४ ठिकाणी चीनने आपली जमीन हडप केली. तुम्ही देशाला सांगा चीनचे सैन्य भारतातून कधी बाहेर काढाल?… ही गेलेली जमीन कधी परत मिळवणार आणि ती कशी मिळवणार ते सांगा, असे प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडिओ ट्विट करत प्रश्न विचारले होते.

वाचा: पेट्रोल-डिझेल दरवृद्धीवर राहुल गांधींचा हल्लाबोल; सुरू केले अभियान

या बरोबरच करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पुन्हा जुन्या मागण्या केल्या.गेल्या तीन महिन्यात कोरनाने देशाची अर्थव्यवस्था नष्ट करून टाकली आहे. या मुळे खूप नुकसान झाले आहे. यामुळे सर्वाधिक नुकसान गरीब, मजूर. मध्यमवर्ग आणि पगारी नोकरदार वर्गाचे झाले आहे. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने न्याय योजनेसारखी योजना लागू करावी. कायम स्वरूपी करायची नसेल तर निदान सहा महिन्यांसाठी लागू करावी. या अंतर्गत प्रत्येक गरिबाच्या बँक खात्यात ७,५०० रुपये टाकावेत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. असे केल्याने बाजारात मागणी वाढेल आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे राहुल गांधी यांचे म्हणणे होते.

वाचा: मोदींच्या ‘मन की बात’वर राहुल गांधी यांचा निशाणा, म्हणाले…Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

housewife women: घरकामामुळे जोपासता येईना आवड – women says we are most time is spend in housework therefore not getting time for passion

म. टा. प्रतिनिधी, नाशिकस्वयंपाकघरात अधिक वेळ घालवावा लागत असल्याने आपली आवड जोपासता येत नसल्याचे मत ८४ टक्के महिलांनी नोंदविल्याची माहिती पुढे आली आहे....

manasi naik wedding: शुभ मंगल सावधान! अभिनेत्री मानसी नाईक अडकली विवाहबंधनात – manasi naik ties the knot with pardeep kharera

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक विवाह बंधनात अडकली असून तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा...

hsc exam 2021: बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना बोर्डाचा मोठा दिलासा – hsc exam 2021 maharashtra boad gives relief to those students with old subjects

राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ या वर्षासाठीच या विषयांची...

Recent Comments