Home देश RAHUL GANDHI TO PM MODI: एक नाही तर तीन ठिकाणी चीननं भारतीय...

RAHUL GANDHI TO PM MODI: एक नाही तर तीन ठिकाणी चीननं भारतीय जमीन बळकावली : राहुल गांधी – ‘speak the truth’: rahul gandhi to pm modi in latest attack on ‘chinese intrusion’


नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय सैनिकांना हौतात्म्य आल्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चीन विवादावरून निशाणा साधलाय. शुक्रवारी पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना काही प्रश्न विचारले आहेत. ‘पंतप्रधानजी, देशाला तुमच्याकडून सत्य ऐकायचंय’ असं या व्हिडिओ पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलंय. ‘चीननं भारतीय जमिनीवर ताबा मिळवलाय आणि आम्ही त्यावर कारवाई करत आहोत, असं पंतप्रधानांनी न घाबरता सांगावं. या परिस्थितीत संपूण देश तुमच्यासोबत आहे’ असं पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी या व्हिडिओत म्हटलं.

‘संपूर्ण देश एकत्रितपणे सरकारसोबत उभा आहे. परंतु, एक प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. काही दिवसांपूर्वी आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं की हिंदुस्तानात कुणीही घुसखोरी केलेली नाही, आपल्या जमिनीवर कुणीही ताबा मिळवलेला नाही. परंतु, सॅटेलाईट फोटो काही वेगळंच सांगत आहेत. सेनेचे माजी जनरल बोलत आहेत तसंच लडाखचे रहिवासी सांगत आहेत की आपली जमीन एका ठिकाणी नाही तर तीन ठिकाणी चीनकडून बळकावण्यात आली आहे’ असं राहुल गांधी यांनी या व्हिडिओत म्हटलंय.

चीनने घुसखोरी केली की नाही?; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
प्रियांका गांधी भडकल्या; यूपी सरकारला केले ‘हे’ आव्हान

‘तुम्हाला खरं बोलावंच लागेल. घाबरण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही म्हटलं की जमीन गेलेली नाही आणि चीननं जमिनीवर ताबा मिळवला असेल तर यामुळे चीनचा फायदा होईल. आपल्याला सोबत या प्रश्नाला लढा द्यायचा आहे आणि निकालात काढायचाय’ असं आवाहनही राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना केलंय.

‘आपल्या शहीद जवानांना हत्यारांशिवाय सीमेवर कुणी आणि का पाठवलं?’ असाही प्रश्न पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.

काश्मीर: सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; १ जवान शहीद, ३ जखमी
सीमेवरील तणाव आणि गलवान हिंसेला चीन जबाबदार, भारताने सुनावले
अर्थातच, प्रश्नांच्या या सरबत्तीमुळे मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा काँग्रेसचा यातून प्रयत्न दिसून येतोय. चीन वादाच्या निमित्तानं विरोधकांना सरकारला घेरण्याची आयती संधी मिळालीय. या अगोदर सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘चीननं भारतीय जमिनीवर ताबा मिळवलेला नाही, घुसखोरी केलेली नाही’ या वक्तव्याला विरोधकांनी चांगलंच फैलावर घेतलंय.

१५ जून रोजी लडाख भागातील गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत आणि चीन दरम्यान तणावात भर पडत चाललीय. चीनला धडा शिकवण्यासाठी भारतात ठिकठिकाणी चीनच्या उत्पादनांवर बंदी आणण्याची मागणी केली होतेय. दरम्यान, गलवान खोऱ्यात आणि पँगाँग सरोवराजवळ चीननं आपल्या सैनिकांची संख्या वाढवल्याचं तसंच काही पायाभूत सुविधाही निर्माण केल्याचं समजतंय.

मोदींनी अप्रत्यक्षपणे साधला ‘या’ काँग्रेस नेत्यावर निशाणा; म्हणाले…
मोदींच्या हस्ते ‘या’ नव्या योजनेची सुरुवात; ५ लाख रोजगार मिळणारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajesh Deshmukh: Rajesh Deshmukh: पुण्यातील सहा रुग्णालयांनी केला ‘हा’ प्रताप!; कठोर कारवाई अटळ – mahatma jyotiba phule jan arogya yojana action will be taken...

पुणे: रुग्णांना ‘ महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना ’ अंतर्गत मिळणारे लाभ न देणाऱ्या सहा रुग्णालयांची योजनेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी शिफारस...

Bihar election: पासवान यांचे श्राद्ध; चिराग नितीशकुमारांचे पाया पडले, पण मन मोकळं केलं तेजस्वीकडे – bihar election nitish kumar chirag paswan tejaswi yadav sat...

पाटणाः विधानसभा निवडणुकीपूर्वी ( bihar election ) बिहारच्या राजकारणाचे ३ सर्वात महत्वाचे चेहरे मंगळवारी एकाच ठिकाणी दिसले. पटणातील एलजेपी कार्यालयात रामविलास पासवान यांच्या...

Recent Comments