Home देश rahul gandhi tweeted a video: मोदींच्या संबोधनापूर्वी राहुल गांधीचा व्हिडिओ; विचारले 'हे'...

rahul gandhi tweeted a video: मोदींच्या संबोधनापूर्वी राहुल गांधीचा व्हिडिओ; विचारले ‘हे’ प्रश्न – former congress president rahul gandhi tweeted a video and asked prime minister modi regarding corona crisis and india china dispute


नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करत चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे. या बरोबरच देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी देशातील गरिबांच्या खात्यावर दरमहा ७,५०० रुपये भरण्याची मागणीही त्यांनी या व्हिडिओद्वारे केली आहे.

देशाच्या भूमीवरून चीनी सैन्य केव्हा बाहेर काढणार?

संपूर्ण देश जाणतो की चीनने भारताच्या पवित्र जमिनीवर कब्जा केला आहे. चीनने घेतली. लडाखमध्ये ४ ठिकाणी चीनने आपली जमीन हडप केली. तुम्ही देशाला सांगा चीनचे सैन्य भारतातून कधी बाहेर काढाल?… ही गेलेली जमीन कधी परत मिळवणार आणि ती कशी मिळवणार ते सांगा, असे प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले आहेत.

‘गरिबांच्या खात्यावर दरमहा ७,५०० रुपये टाका’

या व्हिडिओत राहुल गांधी यांनी करोनाच्या मुद्दयालाही हात घतला. गेल्या तीन महिन्यात कोरनाने देशाची अर्थव्यवस्था नष्ट करून टाकली आहे. या मुळे खूप नुकसान झाले आहे. यामुळे सर्वाधिक नुकसान गरीब, मजूर. मध्यमवर्ग आणि पगारी नोकरदार वर्गाचे झाले आहे. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने न्याय योजनेसारखी योजना लागू करावी. कायम स्वरूपी करायची नसेल तर निदान सहा महिन्यांसाठी लागू करावी. या अंतर्गत प्रत्येक गरिबाच्या बँक खात्यात ७,५०० रुपये टाकावेत. यामुळे बाजारात मागणी वाढेल. अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे राहुल गांधी म्हणाले.

वाचा: ‘मोदी विरुद्ध मनमोहन’; चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधीनी काढले ‘हे’ अस्त्र

‘सरकारकडे आहेत ३ लाख कोटी रुपये’

सरकारने हे नाकारले. हे एकदाच नाकारले नाही. तर चार वेळा याला नकार दिला. यावर सरकार सांगते की आमच्याकडे पैसा नाही. मात्र ही वस्तुस्थिती नाही. सरकारने देशातील १५ सर्वात श्रीमंत उद्योपतींचा लाखो-करोडो रुपयांचा कर माफ केला. तसेच गेल्या तीन महिन्यात नरेंद्र मोदी सरकारने २२ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या. पैशांची मुळीच कमतरता नाही. सरकारकडे ३ लाख कोटी रुपये आहेत. म्हणूनच सरकारने गरिबांच्या खात्यात दरमहा ७,५०० रुपये टाकावेत, असे राहुल गांधी म्हणाले.

वाचा: चीन मुद्द्यावर काँग्रेस एकाकी, कुठल्याच राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही?

ही बातमी देखील वाचा:

पेट्रोल-डिझेल दरवृद्धीवर राहुल गांधींचा हल्लाबोल; सुरू केले अभियानSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik vegetable market: भाजीबाजाराचे लिलाव पुन्हा स्थगित – auction of vegetable market postponed again in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळ नव्याने तयार करण्यात आलेल्या भाजी मार्केटमधील १४५ विक्रेत्यांना ओटे वाटपासाठी २२ ऑक्टोबर रोजी चिठ्ठी...

Recent Comments