Home शहरं नाशिक railway security force: पळालेली तीन चिमुकली पुन्हा मातेच्या कुशीत - three children...

railway security force: पळालेली तीन चिमुकली पुन्हा मातेच्या कुशीत – three children found nashik railway station to railway security force after inform his family


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

“वडील जेलमध्ये, धुणीभांडी करणारी आई दिवसभर कामावर.. आम्हाला पोटभर जेवायलाही मिळत नाही..!” या गरिबीला कंटाळून तीन चिमुकली मुले अखेर घरातून पळाली आणि आईचा जीव भांड्यात पडला. शोधाशोध सुरू झाली नि हा शोध संपला नाशिकरोड रेल्वेस्थानकात. रेल्वे सुरक्षा दलाने ही तिन्ही मुले ताब्यात घेत ती सुखरूप आईच्या कुशीत सुपूर्द केली. मात्र, पोटभर अन्न मिळत नसल्याची मुलांची कैफियत अनेकांच्या काळजाचा ठाव घेणारी ठरली…

नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या माणुसकीमुळे ही तिन्ही मुले आता आईच्या कुशीत विसावली आहेत. या दलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरसिंह गुहिलोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली.

बुधवारी रात्री नऊच्या सुमारास नंदिग्राम एक्स्प्रेस नाशिकरोडला आली. रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक एस. सी. शर्मा व हवालदार राजश्री शिंदे यांना प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर दोन मुली व एक मुलगा आढळला. स्थानकात सध्या कोणालाही प्रवेश नसल्यामुळे ही मुले कोणाची, असा संशय या दोघांना आला. अल्पवयीन मुलांना सुरक्षा दलाच्या कार्यालयात आणून विश्वासात घेऊन प्रेमाने चौकशी केली. मुलांनी सांगितले, की वडील जेलमध्ये आहेत, आई धुणीभांड्यांची कामे करते. आई दिवसभर कामावर असल्यामुळे आम्हाला पोटभर जेवण मिळत नाही. या कारणावरून आम्ही घरातून पळालो होतो.

चाइल्ड केअरकडे ताबा

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुहिलोत यांनी मुलांना आधार देत विश्वासात घेतले. त्यांना नाशिकरोड शहरात काम करीत असणाऱ्या चाइल्ड केअर ग्रुपला कळवून त्यांच्या स्वाधीन केले. मुलांची आई संगीता गणेश भूतकर (रा. मानखुर्द, महाराष्ट्रनगर, मुंबई) यांनी मानखुर्द पोलिस ठाण्यामध्ये मुले हरवल्याबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ही बाब रेल्वे पोलिसांना कळवली. त्यांनी सीसी टीव्हीद्वारे शोधण्याचा प्रयत्न केला असता बुधवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या नंदिग्राम एक्स्प्रेसमध्ये तीन मुले बसल्याचे दिसले. मुंबई रेल्वे पोलिसांनी गाडी जेथे थांबते तेथील सर्व रेल्वे स्थानकांवर याबाबतची माहिती दिली होती. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुहिलोत यांनी मुंबई रेल्वे पोलिस दल व मानखुर्द पोलिसांशी संपर्क करून मुले नाशिकरोडला आल्याचे कळवले. गुरुवारी सकाळी तिन्ही मुलांना त्यांच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तिन्ही मुलं आढळल्यामुळे पोलिसांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : दक्षता घ्या, पुन्हा ‘लॉकडाऊन’ नकोच – be careful, don’t ‘lockdown’ again

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना संसर्गाच्या संकटाशी सामना करण्यासाठी व्यापारीवर्गान वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. अनेक महिने सर्व बाजारपेठ बंद होती. त्यामुळे आर्थिक गणित बिघडले...

Uddhav Thackeray: Uddhav Thackeray: लॉकडाऊन काळात नोकऱ्यांवर गदा; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश – cm uddhav thackeray gave directions on job crisis

मुंबई:करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक तरुणांचे हातचे रोजगार गेले आहेत. त्याचवेळी नव्याने रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच या रोजगारांच्या अनुषंगाने...

Recent Comments