Home शहरं अहमदनगर rain in ahmednagar: जूनमध्येच झाला ३५ टक्के पाऊस - in june alone,...

rain in ahmednagar: जूनमध्येच झाला ३५ टक्के पाऊस – in june alone, it rained 35 percent


म.टा.प्रतिनिधी, नगर

चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर नगरमध्ये बुधवारी रात्री पावसाचे पुन्हा आगमन झाले. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. दरम्यान, बुधवारी संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, पारनेर या तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली.

नगर जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला होता. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. बुधवारी सायंकाळनंतर मात्र जिल्ह्यात सात तालुक्यांमध्ये पावसाचे आगमन झाले. बुधवारी सर्वात जास्त पाऊस हा नगर शहरासह तालुक्यामध्ये झाला आहे. याभागात २० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्याखालोखाल श्रीरामपूर तालुक्यात १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर याकाळात सरासरी ५१५ मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. यंदा जून महिन्याच्या सुरुवातीलाच नगर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १७८ मिलिमीटर पावसाची म्हणजे सरासरी ३५ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी २५ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८४ मिलिमीटर म्हणजेच अवघ्या १६ टक्के पावसाची नोंद झाली होती. त्यातुलनेत यंदा जवळपास १९ टक्के पाऊस जास्त पडला आहे. गुरुवारी देखील जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sensex today: शेअर बाजार ; सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी वधारले – sensex nifty gain today

मुंबई : सकाळच्या सत्रात ४०० अंकांची झेप घेणारा सेन्सेक्स दिवसअखेर १६३ अंकांच्या वाढीसह स्थिरावला. तो ४०७०७ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी...

Bombay high court: डॉक्टरला मारहाण; एक लाखाचा दंड – beating the doctor; a fine of one lakh

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः ‘करोनाचे संकट निर्माण झाल्यानंतर लॉकडाउन काळात सर्व लोक घरात असताना डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जवळच्या लोकांपासून दूर...

Recent Comments