Home शहरं मुंबई Raj Thackeray birthday: १४ जूनसाठी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश, म्हणाले... - Raj...

Raj Thackeray birthday: १४ जूनसाठी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश, म्हणाले… – Raj Thackeray Not To Celebrate His Birthday, Appeals Workers To Continue Corona Relief Work


मुंबई: करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा सूचनावजा आदेश त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. (Raj Thackeray appeals MNS Workers)

वाचा: मी खरंच भाग्यवान आहे; राज ठाकरे झाले भावूक

येत्या रविवारी, १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. राज यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी पक्षाकडून अनेक कार्यक्रम राबवले जातात. मनसेचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून राज यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करतात. याच पार्श्वभूमीवर राज यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

‘१४ तारखेला माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण ह्या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. करोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही, थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही आणि म्हणूनच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझा सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात, तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत,’ असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Live: राज्यात आतापर्यंत ४६ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त

‘महाराष्ट्रातील जनतेसाठी तुमचं सुरू असलेलं मदतकार्य नक्की चालू ठेवा पण हे करताना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवाची काळजी घ्या, तुमच्या जीवापेक्षा मला अधिक मोलाचं काहीच नाही. सगळं सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणारच आहे, तेव्हा तुमच्याशी भेट होईलच,’ असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.

मनसैनिकांच्या त्यागाचं कौतुक

वाढदिवसानिमित्त आवाहन करतानाच राज ठाकरे यांनी करोनाच्या काळात मनसैनिकांनी केलेल्या कामाची तोंडभरून स्तुती केली आहे. ‘जीवाची पर्वा न करता तुम्ही केलेल्या कामाला आणि तुमच्या कुटुंबीयांच्या त्यागाला माझा सलाम,’ असं राज यांनी म्हटलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

devendra fadnavis covid positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; राऊत म्हणाले… – sanjay raut wishes devendra fadnavis for speedy recovery

मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. संजय राऊत यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी 'फडणवीस लवकर बरे होवोत यासाठी...

Recent Comments