Home शहरं मुंबई raj thackeray praises mns workers: मी खरंच भाग्यवान आहे; राज ठाकरे झाले...

raj thackeray praises mns workers: मी खरंच भाग्यवान आहे; राज ठाकरे झाले भावूक – coronavirus: mns chief raj thackeray praises party workers for their work in tough times


मुंबई: करोनाच्या संकटाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आणि पदरमोड करून जनतेला मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. ‘मला असे सहकारी मिळाले याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘दहशतवाद्यांचा अड्डा’ असा आरोप झालेले जेएनयू हेच का?: आव्हाड

राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. करोनाच्या परिस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘गेल्या दोन, तीन महिन्यांच्या काळात येणाऱ्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या होत्या. त्यात दिलासा देणारी एक बातमी होती. ती म्हणजे माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं काम. ह्या कठीण प्रसंगात माझा महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणावर पदरमोड करून लोकांच्या मदतीला धावून जात होता. अन्नधान्य वाटपापासून ते रुग्णांना रुग्णालयात मिळवून देणाऱ्या, रुग्णांच्या कुटुंबीयांना धीर देऊन त्यांच्या गरजेला उभ्या राहणाऱ्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचायच्या. त्याबद्दल ऐकून एकाच वेळी मला आनंद आणि अभिमान वाटायचा.’

‘माझ्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक मी अनेकांच्या तोंडून ऐकलं. अनेकांनी मला व्यक्तिश: कळवलं. असे सहकारी मिळाले हे माझं भाग्य आहे. माझ्या अनेक सैनिकांना करोना झाला. पण तरीही ते आणि त्यांचे कुटुंबीय मागे हटले नाहीत. महाराष्ट्राच्या निस्सीम व निर्व्याज प्रेमातूनच ही ताकद येते. तुमच्या या ताकदीला आणि तुमच्या कुटुंबीयांच्या धैर्याला आणि त्यागाला माझा सलाम,’ असं राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Live: राज्यात आतापर्यंत ४६ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पुकारल्यापासून राज ठाकरे हे अधूनमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते आणि लोकांना दिलासा देण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करत होते. आपण केलेल्या मदतकार्याचे फोटो मला पाठवा, असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या आवाहनला प्रतिसाद देऊन मनसे कार्यकर्ते जोमानं मदतकार्यात उतरले होते. त्यांच्या याच त्यागाचं कौतुक राज यांनी केलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

वाहतुकीचे वर्तमान आणि भविष्य

जितेंद्र अष्टेकर शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून पाच किलोमीटरच्या अंतरापर्यंत फक्त पाच रुपयांत प्रवासाची सुविधा आणि याच सार्वजनिक...

Kangana Ranaut Replied To Notice Of Mumbai Police Over Sedition Case – भावाचे लग्न आहे… कंगनाचे मुंबई पोलिसांच्या नोटिशीला उत्तर

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई देशद्रोहाच्या गुन्ह्यात पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठविल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौट हिने हजर राहण्यासाठी मुदत मागितली आहे. भावाचे लग्न असल्याने...

LIVE : मराठा आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स Source link

Recent Comments