Home शहरं मुंबई Raj Thackeray's maids test Positive: Raj Thackeray: राज ठाकरेंच्या घरी काम करणाऱ्या...

Raj Thackeray’s maids test Positive: Raj Thackeray: राज ठाकरेंच्या घरी काम करणाऱ्या दोघांना करोनाची लागण – corona enters mns chief raj thackeray’s house, two people test positive


मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी काम करणाऱ्या दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. या दोन्ही व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. (Corona enters Raj Thackeray’s home)

Live: राज्यातील करोनामुक्त रुग्णांची संख्या ८० हजारच्या उंबरठ्यावर

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन सुरक्षा रक्षकांना व दोन चालकांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी चालकांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असून सुरक्षा रक्षक करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळं धोका टळला असं वाटत असतानाच आता राज यांच्या घरी काम करणाऱ्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळं मनसैनिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

वाचा: काँग्रेसच्या बचावासाठी शिवसेना धावली, भाजपला दिला ‘हा’ सल्ला

धारावीनंतर मुंबईतील दादर, माहीम भागात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात रोजच्या रोज रुग्ण सापडत आहेत. दादर येथील शिवसेना भवनातही काही दिवसांपूर्वीच करोनानं धडक दिली आहे. शिवसेना भवनात नियमित येणाऱ्या एका शिवसैनिकाला करोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर शिवसेना भवन काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलं असून संपूर्ण इमारतीचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे.

वाचा: ‘सीमावादाविषयी नक्की खरं कोण बोलतंय? भारताचे राजदूत की पंतप्रधान?’

मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा ७० हजारच्याही पुढं गेला आहे. यापैकी ३९ हजारांहून अधिक रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत तर २८ हजारांहून अधिक रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर, महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५२ हजार ७६५ झाली आहे. यातील ७९,८१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर, सध्या ६५,८२९ जणांवर उपचार सुरू आहेत.

वाचा: तरुण संशोधकाचा करोनाने मृत्यू; आईचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

वाचा: मुंबईत धडधाकट करोना रुग्णांत दिसतंय एक नवीन लक्षण; डॉक्टर झाले हैराणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

राज्यपालांची ‘सक्रिय लुडबूड’ संविधानविरोधी!

अ‍ॅड. सुरेश पाकळे संविधानाने स्थापन केलेल्या लोकशाही संस्थांमध्ये, आपसांत संघर्ष होण्याची स्थिती, भारतात अनेक वेळा येत असते. राज्याचे व मुख्यमंत्री यांचे नेमके...

vaccination in aurangabad: करोना लसीकरणासाठी ३७३ ठिकाणे निश्चित – municipal corporation has identified 373 places for vaccination

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनावरील आजारावरील लसीकरणासाठी महापालिकेने ३७३ ठिकाणे निश्चित केली आहेत. व्हॅक्सीनेटरची नावे देखील ठरविण्यात आली असून, ही सर्व माहिती पालिकेने शासनाला...

‘त्यांची’ झेप देहविक्रीकडून आत्मनिर्भरतेकडे

: ग्राहकाची वाट पाहणे हे व्यावसायिकाचे नशीबच असते. त्याला कुणीही अपवाद नाही, अगदी देहविक्रय करणाऱ्या महिलादेखील. परंतु, करोनासारख्या साथीमुळे 'सुरक्षित वावरा'चा नारा...

Recent Comments