Home देश rajasthan rajya sabha election 2020: मागच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने मध्य प्रदेश गमावलं;...

rajasthan rajya sabha election 2020: मागच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने मध्य प्रदेश गमावलं; आता राजस्थान रडारवर?


जयपूर : राज्यसभा निवडणूक येताच पुन्हा एकदा रिसॉर्ट पॉलिटिक्सला सुरुवात झाली आहे. मागच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने मध्य प्रदेश गमावल्यानंतर आता या निवडणुकीतही ऑपरेशन लोटसचा धोका आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आज आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर अशोक गहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडेय, राज्यसभा उमेदवार केसी वेणुगोपाल आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.

आमदार फुटू नये यासाठी जयपूरमधील शिव विलास रिसॉर्टमध्ये राजकारण तापलं आहे. मध्य प्रदेशसारखीच परिस्थिती राजस्थानमध्येही निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचं नेतृत्त्व आता सक्रीय झालेलं दिसत आहे. या परिस्थितीत केसी वेणुगोपाल यांनाच जयपूरला पाठवण्यात आलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे ‘भाजप’पासून दूर? हे आहे सत्य

गहलोत आणि पायलट यांच्यात मतभेद?

अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेद लपून राहिलेले नाहीत. केसी वेणुगोपाल यांनी या दोघांचे मतभेद मिटवण्यावर सर्वात अगोदर काम केलं. काँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून ऑफर देण्यात येत असल्याचा आरोप गहलोत यांनी केला होता. यानंतर काही आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं. पण या आरोपानंतर सचिन पायलट गटाचे आमदार भडकले. कुणाला भाजपचे फोन आले हे स्पष्ट करावं याचं स्पष्टीकरण देण्याची मागणी पायलट गटाने केली. यानंतर गहलोत आणि पायलट यांच्यात बैठक झाली.

करोनाच्या संकटात राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणूक

काय आहे पूर्ण प्रकरण?

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार काँग्रेस दोन आणि भाजप एक जागा जिंकत आहे. काँग्रेसने केसी वेणुगोपाल आणि नीरज डांगी यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने मोठी खेळी खेळळी आहे. भाजपने एकाच्या ऐवजी राजेंद्र गहलोत आणि ओंकार सिंह लखावत हे दोन उमेदवार दिले आहेत. त्यामुळे भाजप आता दुसऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी फोडाफोडी करणार याची भीती काँग्रेसला आहे.

ज्योतिरादित्यांची कथित ऑडियो क्लिप व्हायरल, ‘५० लाखावर होतेय चर्चा’

काँग्रेसने या भीतीनंतर सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती पाहता काँग्रेसने भारतीय ट्रायबल पक्षाचे दोन आमदारही सोबत घेतले आहेत. मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आमदारांनाही रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनाच ऑपरेशन लोटसची भीती असून आमदार वाचवण्यासाठी ते स्वतः बैठका घेत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: वाईटावर चांगल्याचा विजय; कंगनानं पुन्हा राऊतांना डिवचलं – kangana ranaut attacks on cm uddhav thackeray, sanjay raut

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळं चर्चेत असते. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या कंगानानं पुन्हा एकदा संजय...

Kalyan Kale: ‘देवगिरी’त बागडेंनी आडवे येऊ नये – former mla dr. kalyan kale warns to mla haribhau bagde over devgiri cooperative sugar factory

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री'देवगिरी कारखान्यावर प्रशासकीय मंडळ येणारच. कारखाना सुरू होणार यात शंका नाही. मात्र, या कामात आमदार हरिभाऊ बागडेंनी आडवे येऊ नये,'...

Recent Comments