Home मनोरंजन Rajesh Khattar Shares First Pictures Of His Son Vanraj On Social Media...

Rajesh Khattar Shares First Pictures Of His Son Vanraj On Social Media – पाहा शाहिद- ईशानच्या सावत्र भावाचा पहिला फोटो


मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचे सावत्र वडील आणि इशान खट्टरचे वडील राजेश खट्टर पुन्हा एकदा बाबा झाले. नुकताच त्यांनी आपल्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात जन्माला आलेल्या बाळाचं नाव राजेश यांनी वनराज असं ठेवलं आहे.

राजेश यांनी पत्नी लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिलं की, ‘सर्वांना माझा नमस्कार. (सर्वोत्कृष्ट लोकांना माझा आधी नमस्कार.) बाबांच्या सांगण्यानुसार सध्या जगासाठी एक कठीण काळ सुरू आहे. पण हा वेळही निघून जाईल आणि आम्हा मुलांसाठी तुम्ही या जगाला अजून सुंदर कराल. तुम्ही घरात सुरक्षित रहात आम्हालाही सुरक्षित ठेवाल.’ या पोस्टसह राजेश यांनी पत्नी आणि मुलाचे तीन फोटो शेअर केले.


राजेश खट्टर आणि वंदना सजनानी यांच्या लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाली. दोघांनी २००८ मध्ये लग्न केलं होतं. वनराजच्या जन्मानंतर अनेक टीव्ही कलाकारांनी सोशल मीडियावर राजेश आणि वंदनाला शुभेच्छा दिल्या होत्या. राजेश यांनी १९९० मध्ये शाहिद कपूरची आई नीलिमा अजीमशी लग्न केलं होतं. २००५ मध्ये ईशान खट्टरचा जन्म झाला. २००१ मध्ये राजेश आणि नीलिमा वेगळे झाले. राजेश यांच्याआधी नीलिमा यांचं लग्न अभिनेते पंकज कपूरशी झालं होतं त्यांना शाहिद कपूर हा मुलगा आहे.





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

new farm laws: farm laws : निवडणुकांमधून जनतेचे नवीन कृषी कायद्यांवर शिक्कामोर्तब, भाजपचा दावा – people support new farm laws in elections says prakash...

नवी दिल्लीः गुजरातमधील महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. नव्या कृषी कायद्यांना ( new farm laws ) शेतकरी आणि...

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

Recent Comments