Home शहरं मुंबई Rajesh Tope : 'देवळं बंद असताना तुमच्या रूपानं देव सगळ्यांना दिसतोय' -...

Rajesh Tope : ‘देवळं बंद असताना तुमच्या रूपानं देव सगळ्यांना दिसतोय’ – Doctors Day : Rajesh Tope Writes Open Letter To Doctors


मुंबई: ‘लॉकडाऊमुळं आज सगळीकडं धार्मिक स्थळं बंद असताना तिथला देव तुमच्या रूपानं आम्हा सगळ्यांना दिसतोय. हजारो रुग्ण तुमच्या प्रयत्नांमुळं बरे होऊन घरी जात आहेत. तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत,’ अशा भावना व्यक्त करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Rajesh Tope’s Letter to Doctors)

वाचा: राजेश टोपेंनी शेअर केला खास व्हिडिओ, डॉक्टरांना सलाम

डॉक्टर दिनाचं औचित्य साधून टोपे यांनी आज डॉक्टरांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. ‘तुमचा असा कुठलाही एक दिवस असू नये. कारण देवाचा कुठला असा एक दिवस नसतो. तो दररोज आपल्यात हवा असतो,’ असं टोपे यांनी म्हटलं आहे.

वाचा: ‘लालबागचा राजा’चा गणेशोत्सव रद्द; यंदा फक्त आरोग्यउत्सव

‘गेल्या जवळपास साडेतीन महिन्यांपासून तुम्ही-आम्ही सर्वच जण करोनाला हरवण्याच्या ध्येयाने लढतोय. आरोग्य कर्मचारी, पोलीस व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळं करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत आहे. डॉक्टर, आपली जबाबदारी मोठी आहे. करोनाच्या कल्पनेने हादरून गेलेल्या रुग्णांवर उपचार करून, त्यांच्या मनाला उभारी देऊन त्यांना पूर्ववत करण्याचं काम आपण करत आहात. रुग्णांच्या संपर्कात राहून व त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवून त्यांना आजारातूनच नव्हे मानसिक पाठबळ देऊनही नव्यानं उभं करत आहात. आपल्या या सेवेचं मोल कशातही मोजता येणार नाही,’ अशी कृतज्ञता टोपे यांनी व्यक्त केली आहे.

रुग्णसेवेचं अखंड व्रत घेवून अहोरात्र सेवा देणाऱ्या कोरोना योध्यांच्या रूपातील सर्व समर्पित डॉक्टरांना #doctorsday च्या खूप खूप शुभेच्छा..!

Rajesh Tope यांनी वर पोस्ट केले मंगळवार, ३० जून, २०२०


‘आज राज्यात दीड लाख करोनाबाधितांपैकी जवळपास ९० हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून केलेल्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे. या संकट काळात कुटुंबातील सदस्यांना घरी सोडून येताना आपली मानसिक स्थिती काय होत असेल याची कल्पना आहे. तरीही कर्तव्य भावनेपोटी आपण दररोज घराबाहेर पडता. सामान्य नागरिकांना घरी थांबण्याचा प्रेमळ सल्लाही देता. डॉक्टर तुम्हाला आणि तुमच्या कार्याला सलाम,’ असं टोपे यांनी शेवटी पत्रात म्हटलं आहे.

वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी मोजक्या शब्दांत

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gupkar Declaration: काश्मिरात हालचालींना वेग; मेहबूबा मुफ्तीच्या निवासस्थानी आज मोठी बैठक – gupkar declaration peoples alliance for declaration meeting at mehbooba mufti residence

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या निवासस्थानी पीपल्स अलायन्स फॉर डिक्लरेशची (PAD) आज बैठक होत...

Devendra Fadnavis Corona Positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; केलं ‘हे’ आवाहन – opposition leader devendra fadnavis tests positive for covid 19

मुंबई: करोना काळात राज्यभर दौरे करणारे व लोकांना भेडसावणारे प्रश्न राज्य सरकारकडे मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे....

Recent Comments