Home मनोरंजन Rajkummar Rao Will Promote Sushant Singh Rajput Last Film Dil Bechara -...

Rajkummar Rao Will Promote Sushant Singh Rajput Last Film Dil Bechara – आता सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचं प्रमोशन करणार राजकुमार राव


मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या निधनामुळे बॉलिवूडपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत अनेकांनी दुःख व्यक्त केलं. दरम्यान, सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा शेवटचा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या २४ जुलैला डिझनी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. असं असलं तरी अभिनेत्याचे चाहते त्याचा शेवटचा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावा याची मागणी करत आहेत. पण निर्मात्यांनी हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असल्याचं आधीच स्पष्ट केलं.

सुशांतचे वडील म्हणाले, त्याच्यासाठी घातलं होतं साकडं

अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत राजकुमार रावने सोशल मीडियावर लिहिलं की, ‘भावा तुझी आठवण येईल.’ दरम्यान, राजकुमारने प्रमोशनची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. ज्याक्षणी सुशांतचा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार हे पक्क झालं. त्यानंतर लगेच राजकुमारने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर सिनेमाचं पोस्टर शेअर केलं. राजकुमार आणि सुशांतने ‘काय पो छे (Kai Po Che)’ आणि ‘राब्ता (Raabta)’ या दोन सिनेमात एकत्र काम केलं होतं. सुशांतच्या सिनेमाचं पोस्टर शेअर करताना त्याने हार्टवालं इमोजी कॅप्शनमध्ये शेअर केलं.

२०१४ मध्ये आलेल्या हॉलिवूडच्या ‘द फॉल्ट इन अवर स्टार’ या चित्रपटाचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट रिमेक आहे. सुशांतचा ‘दिल बेचारा’ ही एक प्रेमकथा असून, त्यात संजना संघी त्याची नायिका आहे. अभिनेता सैफ अली खान यानं देखील या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट जॉन ग्रीनच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे.


सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही समोर आलं नसलं तरी बॉलिवूडमधल्या घराणेशाहीमुळं त्याच्यावर ही वेळ आली असं त्याच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.त्यामुळं त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित करण्यात यावा, ‘आम्हाला आमच्या हिरोला शेवटंचं मोठ्या पडद्यावर पाहयचं आहे’, असं सुशांतच्या चाहत्यांनी म्हटलं होतं. ८ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाउनमुळं हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांचा फोटो करतो हताश

१४ जून रोजी ३४ वर्षांचा सुशांत त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. नैराश्यग्रस्त अवस्थेत सुशांतनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्येत होता. यावर तो उपचारही घेत होता.छोट्या पडद्यावर ‘किस देश में है मेरा दिल’, ‘पवित्र रिश्ता’ या त्याच्या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर ‘काय पो छे’ सुशांतनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘राबता’, ‘पिके’, ‘छिछोरे’ या सिनेमांतून त्यानं आपली अभिनयक्षमता सिद्ध करून बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं होतं.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Devendra Fadnavis: फडणवीसांनी शब्द पाळला; करोना उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांत दाखल – bjp leader devendra fadnavis tested covid positive admitted to government hospital

मुंबईः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांना पुढील उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांत दाखल करण्यात...

renuka mata temple: देवी तुझ्या भक्तीने तहान, भूक हरली! – navratri 2020, history of renuka mata devi mandir

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्रीफुलंब्री - राजूर रस्त्यावरील रिधोरा येथे रेणुका मातेचे भव्य मंदिर आहे. देवीच्या यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक येतात. मात्र, यंदा करोनामुळे...

railway security force: पळालेली तीन चिमुकली पुन्हा मातेच्या कुशीत – three children found nashik railway station to railway security force after inform his family

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड"वडील जेलमध्ये, धुणीभांडी करणारी आई दिवसभर कामावर.. आम्हाला पोटभर जेवायलाही मिळत नाही..!" या गरिबीला कंटाळून तीन चिमुकली मुले अखेर घरातून...

Recent Comments