Home देश Rajnath Singh: india-china clash : राजनाथ सिंह मॉस्कोला जाणार; चीनी नेत्यांना भेटणार...

Rajnath Singh: india-china clash : राजनाथ सिंह मॉस्कोला जाणार; चीनी नेत्यांना भेटणार नाही – India China Clash Defence Minister Rajnath Singh Will Not Meet Chinese-Leaders During His Visit To Moscow


नवी दिल्ली: लडाखमधील एलएसीवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. मात्र, ते आपल्या या दौऱ्यात चीनच्या वरीष्ठ नेत्यांना न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. राजनाथ सिंह २२ जून या दिवशी रशियाला रवाना होत आहेत.

रशियाने नाझी जर्मनीवर विजय प्राप्त केल्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंग सहभागी होतील.

आपल्या या रशिया दौऱ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रशियाच्या तसेच इतर देशांच्या नेत्यांना भेटणार आहेत. मात्र लडाखमध्ये गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेमुळे ते चीनी नेत्यांना भेटण्याचे टाळणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत संरक्षण विभागाचे सचिव अजय कुमार आणि प्रत्येक सशस्त्र दलाचे वरिष्ठ अधिकारी असणार आहेत. आंतरराष्ट्रीय मंचावर चीनी नेत्यांना न भेटून भारत चीनला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

लडाखमधील घटनेनंतर अमेरिकेने अमेरिकेने भारताबरोबर आपली एकजूट असल्याचे दाखवली आहे. त्यानंतर चीनी नेत्यांना न भेटण्याचा निर्णय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

वाचा:चीनी हल्ला पूर्वनियोजित होता; सरकार झोपेत होते- राहुल गांधींचे टीकास्त्र

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी आज शु्क्रवारी ट्विट करत शहिदांना नमन केले आहे. ते लिहितात, ‘चीनशी झालेल्या वादात शहीद झालेल्या भारताच्या जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खाच्या काळात आम्ही जवान, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे जवळचे आणि भारतीय लोकांसोबत आहोत.’

वाचा:‘अक्साई चीन परत मिळवणं कठीण, पण अशक्य नाही’
दरम्यान, भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेला तणाव आणि त्यानंतर गलवान खोऱ्यात झालेल्या चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय जवानांना हौतात्म्य आल्यानंतर देशात तणाव निर्माण झाला आहे. या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये देशातील १७ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीत लडाखच्या गलवानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.

वाचा: चीनचे काय करायचे?; पंतप्रधानांची सर्वपक्षीय बैठक आजSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rr vs csk live score: Chennai Super Kings vs Rajasthan Royals 37th Match IPL Live Cricket Score Updates From Sheikh Zayed Stadium – CSK...

अबुधाबी:IPL 2020 अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर आयपीएल २०२० मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (CSK vs RR)अशी लढत होत आहे. गुणतक्त्यात...

final year exams 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा संपल्या; दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा – mumbai university final year exams 2020 ended successfully, over...

Mumbai University Exams 2020: ऑक्टोबर- मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाच्या सर्व परीक्षा या वेळेत आणि सुरळीत पार पडल्या. दिनांक २५...

Nawab Malik: Nawab Malik: लोकल सुरू करायला राज्य सरकार तयार!; ‘या’ मंत्र्याचा गोयल यांच्यावर आरोप – restore local train service in mumbai says nawab...

मुंबई: 'मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागत आहे तो कमी करण्यासाठी नियमित लोकलसेवा सुरू करण्यात यावी', अशी अत्यंत महत्त्वाची मागणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री...

Recent Comments