Home क्रीडा raju bhavsar: लढत टळावी यासाठी सामना गमावल्याचा ठपका; प्रशिक्षक,खेळाडूंवरील बंदी मागे -...

raju bhavsar: लढत टळावी यासाठी सामना गमावल्याचा ठपका; प्रशिक्षक,खेळाडूंवरील बंदी मागे – kabaddi raju bhavsar, behind the ban on players


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाचे माजी प्रशिक्षक राजू भावसार आणि त्यांच्यासोबत तत्कालिन महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू सायली केरीपाळे, स्नेहल शिंदे, दीपिका जोसेफ तसेच सहाय्यक प्रशिक्षक मनीषा गावंड यांच्यावर राज्य कबड्डी असोसिएशनने घातलेली बंदी मागे घेण्यात आली आहे. राज्य कबड्डीचे सचिव आस्वाद पाटील यांनी ही माहिती दिली.

गेल्या वर्षी पटना, बिहार येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला प्राथमिक फेरीत पराभव पत्करावा लागला होता. महाराष्ट्राच्या संघाने रेल्वेविरुद्ध लढत टळावी, यासाठी प्राथमिक फेरीतला सामना गमावल्याचा ठपका या सगळ्यांवर ठेवण्यात आला होता. त्यावरून राजू भावसार आणि दीपिका यांच्यावर शिस्तपालन समितीने पाच वर्षांची तर सायली, स्नेहल आणि मनीषा गावंड यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. पण सोमवारी झालेल्या राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यकारिणीच्या ऑनलाइन बैठकीत ही बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला. खेळाडूंचे भविष्यात नुकसान होऊ नये, या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे आस्वाद पाटील म्हणाले. या निर्णयामुळे खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे. गेले वर्षभर त्यांना या बंदीमुळे बराच मानसिक ताण सहन करावा लागला होता.

कबड्डी दिन साजरा करा

त्याशिवाय, राज्य संघटनेने पुढील महिन्यात १५ जुलैला होणारा कबड्डी दिन सर्व जिल्हा संघटनांना राज्य सरकारच्या करोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केवळ जिल्हा संघटनेच्या मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बुवा साळवी यांच्या स्मृत्यर्थ दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Madhya Pradesh: madhya pradesh: अंधश्रद्धेचा बळी; जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलाची झोपेतच केली हत्या – human sacrifice woman allegedly axed her 24 year old son...

पन्ना: मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. जन्मदात्या आईनेच झोपेत असलेल्या मुलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. मी देवीचा अवतार...

environmental activists: वाशी डेपोचे काम थांबवा! – environmental activists demands stop vashi depot development project work to cm uddhav thackeray and aditya thackeray

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईनवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा बहुप्रतिक्षित प्रकल्प म्हणून वाशी डेपोच्या विकास प्रकल्पाकडे बघितले जाते. या ठिकाणी २१ मजल्यांचा टॉवर...

coronavirus in Nashik: हलगर्जीपणा ठरेल घातक! – negligence regarding health would be dangerous says expert

म. टा. प्रतिनिधी, नाशिकएकीकडे करोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने भीतीचे सावट दूर होत असले, तरी सकाळी उकाडा, दुपारी मुसळधार पाऊस, सायंकाळी गारवा या...

Recent Comments