Home शहरं कोल्हापूर Raju Shetti: Raju Shetti : 'स्वाभिमानी'तील गैरसमज संपले; राजू शेट्टींबाबत घेतला 'हा'...

Raju Shetti: Raju Shetti : ‘स्वाभिमानी’तील गैरसमज संपले; राजू शेट्टींबाबत घेतला ‘हा’ निर्णय – internal dispute is over raju shetti accepted ncps mlc seat offer


कोल्हापूर: राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी अखेर राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांचे नाव सुचवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे दोन दिवस चाललेल्या संघटनेतील वादावर पडदा पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राजू शेट्टी यांचे नाव विधान परिषदेसाठी देण्यात येणार आहे.

वाचा: घरच्या कट्यारीचे घाव जिव्हारी: राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी यांचे नाव विधान परिषदेसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील व खजिनदार अनिल मादनाईक यांनी विरोध केला होता. शुक्रवारी रात्री या दोघांसह संघटनेच्या प्रमुख नेत्यांची जयसिंगपूर येथे बैठक झाली. या बैठकीत घरातील भांडण घरातच मिटविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांचेच नाव विधान परिषदेसाठी सुचविण्याचे ठरले. यामुळे गेले दोन दिवस संघटनेत सुरू असलेले वादळ शमले आहे.

बैठकीबाबत स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख नेते राजू शेटटी, प्रा. डॉ. जालिंदर पाटील, अनिल मादनाईक, डॉ. महावीर अक्कोळे, पै. विठ्ठल मोरे, भाऊ साखरपे, जनार्दन पाटील, अजित पवार, डॉ. श्रीवर्धन पाटील यांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. त्यात ‘आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परिवारातील ज्येष्ठ नेते आज एकत्र जमलो. कळत न कळत आमच्यामध्ये जे गैरसमज निर्माण झाले होते ते सर्व संपले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ होती व नेहमीच एकसंघ राहील. कारण आम्ही सर्वजण शेतकरी हिताशी बांधील आहोत. आमच्यामध्ये आता कसलेही मतभेद उरले नाहीत. आम्ही सर्वजण एकदिलाने ,एकजुटीने व एकमताने चळवळीचे काम करू’, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

वाचा: राजू शेट्टी पवारांच्या गोविंद बागेत; आंदोलन केले तिथेच आमदारकी स्वीकारली!

शेट्टी म्हणाले होते, ही ब्यादच नको!

राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेच्या १२ रिक्त जागा भरायच्या असून त्यापैकी एका जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून आला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत भेट घेऊन शेट्टी यांनी हा प्रस्ताव स्वीकारला होता. मात्र, शेट्टी यांना संघटनेतून विरोध झाल्याने वादळ उठले. त्यानंतर शेट्टी यांनीही स्वाभिमानी बाणा दाखवत विधान परिषदेची ब्यादच नको, असा पवित्रा घेतला. ‘आजपर्यंत अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरून झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरून येतात, पण घरच्या कट्यारीचे घाव जिव्हारी लागतात; असं सांगतानाच स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधान परिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच’, असे शेट्टी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. दरम्यान, आजच्या बैठकीत या सर्व वादाला पूर्णविराम देण्यात आला आहे.

वाचा: ..म्हणून राजू शेट्टींनी स्वीकारला शरद पवारांचा ‘हा’ प्रस्ताव!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Corona Update: coronavirus – तीन मृत्यू, ८४ नवे बाधित – aurangabad reported 84 new corona cases and 3 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण करोना बळींची संख्या १०५८ झाली आहे. त्याचवेळी सोमवारी (२६ ऑक्टोबर) जिल्ह्यात ८४ नवे...

Mumbai High Alert Get Input Of Terrorist Attack – मुंबईत हायअलर्ट; दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने माहिती...

Recent Comments