Home देश rajya sabha election 2020: राज्यसभा निवडणूक : भाजपकडून ज्योतिरादित्य तर काँग्रेसकडून दिग्विजय...

rajya sabha election 2020: राज्यसभा निवडणूक : भाजपकडून ज्योतिरादित्य तर काँग्रेसकडून दिग्विजय मैदानात


नवी दिल्ली : करोना फैलाव सुरू असतानाच देशात राज्यसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागलेत. निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या १० राज्यांच्या २४ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केलीय. या सर्व जागांसाठी येत्या १९ जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात राज्यसभेची निवडणूक वेगळ्याच रंगात आहे.

मध्य प्रदेशात आमदार फुटल्यानं काँग्रेसच्या हातातून सत्ता निसटलीय. आत्तापर्यंत काँग्रेसचा हात धरलेले ज्योतिरादित्य शिंदे आता भाजपच्या गोटात शिरलेले आहेत. शिंदे यांनी पक्ष सोडताना आपल्यासोबत काँग्रेसच्या २२ आमदारांनाही फोडलं. त्यामुळेच राज्यात कमलनाथ सरकार कोसळलं. आता ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या तिकीटावर राज्यसभेच्या मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या तिकिटावर दिग्विजय सिंह यांना राज्यसभेवर धाडण्याची तयारी करण्यात आलीय.

उल्लेखनीय म्हणजे, मध्य प्रदेशात राज्यसभेच्या तीन जागांसाठी ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह सोलंकी यांना संधी मिळालीय. तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांच्यासोबत फूल सिंह बरैया यांना तिकीट देण्यात आलंय.

… तर महाराष्ट्र सरकारला पडण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही : अमित शाह
अमित शहा ममतादीदींवर भडकले; म्हणाले, ‘तुमची ‘ती’ इच्छा पूर्ण होईल’

काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांना तर भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे यांना पहिली जागा निश्चित मानली जातेय. त्यामुळे, दोन्हीही नेते राज्यसभेत पोहचण्यात यशस्वी ठरतील, असं समजलं जातंय. परंतु, पेच आहे तो केवळ तिसऱ्या जागेचा… काँग्रेसच्या २२ आमदारांच्या राजीनाम्यानंतर राजकारणाचं संपूर्ण गणितंच पालटलंय. त्यामुळे तिसरी जागा आता आणखीनच चुरशीची झालीय.

राज्यात कमलनाथ सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी बहुमत सिद्ध करताना त्यांच्या गोटात ११२ आमदार होते. यातील १०७ आमदार भाजपचे होते तर सपा, बसपा आणि अपक्षांनी शिवराज सरकारला समर्थन दिलं होतं.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत आंध्र प्रदेश ४, गुजरात ४, झारखंड २, मध्य प्रदेश ३, राजस्थान ३ तसंच मणिपूर-मेघालयाच्या १-१ जागेचा समावेश आहे. तसंच जून-जुलैमध्ये रिकाम्या होणाऱ्या अरुणाचल प्रदेश १, कर्नाटकच्या ४ आणि मिझोरमच्या एका जागेवरही ही निवडणूक पार पडतेय.

पंतप्रधान मोदींनंतर राहुल गांधींचीही ‘मन की बात’?
आता मोदी कोठे आहेत, सांगा!; कपिल सिब्बल यांचा सवालSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Audio clip of Shiv Sena’s BMC corporator: पालिकेत सेना-भाजप संघर्ष – bjp corporators agitation against shivsena over audio clip of shiv sena’s bmc corporator...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढीस लागत असून, मुंबई पालिकेतही त्याचे पडसाद उमटत आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत...

ranjitsinh disale: वैश्विक शिक्षक : रणजितसिंह डिसले – india’s zp school teacher ranjitsinh disale wins 2020 global teacher prize

‘युनेस्को’ आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या ‘ग्लोबल टीचर’ या सन्मानासह सुमारे सात कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविणारे रणजितसिंह डिसले हे खऱ्या अर्थाने वैश्विक शिक्षक...

आजचं राशीभविष्य… दिनांक ०५ डिसेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ०५ डिसेंबर २०२० Source link

Recent Comments