Home देश rapid antibody tests : रॅपिड अँटीबॉडी टेस्टवर तूर्तास स्थगिती, सूत्रांची माहिती -...

rapid antibody tests : रॅपिड अँटीबॉडी टेस्टवर तूर्तास स्थगिती, सूत्रांची माहिती – coronavirus india update rapid antibody tests put on hold, icmr to check accuracy sources


नवी दिल्लीः केंद्र आणि राज्यांमध्ये तूर्तास रॅपिड अँटीबॉडी टेस्टला स्थगिती देण्यात आली आहे. आयसीएमआरकडून रॅपिड अँटीबॉडी टेस्ट अचुकता तपासली जात आहे तोपर्यंत ही टेस्ट स्थगित राहील, असं सूत्रांनी सांगितलंय. चीनकडू घेतलेल्या दोन कंपन्यांकडून रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्सच्या तपासणीसाठी आयसीएमआरकडून एक पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्स फोन ठरल्याच्या तक्रारी काही राज्यांनी केल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्समधून समोर येत असलेले निदान वेगवेगळे आहेत. त्यात समानता नाहीए. यामुळे त्यावर आपण अवलंबून राहणं योग्य नाही, असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेनेही या टेस्ट किट्सच्या अचुकतेबाबत काहीच स्पष्टता केलेली नाही. यामुळे आयसीएमआरकडून त्याची पडताळणी सुरू आहे. काही प्रयोगशाळांमध्येही टेस्ट किट्सची तपासणी सुरू आहे. यामुळे रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्स बाबत लवकरच नवीन दिशानिर्देश जारी होतील, असं हर्षवर्धन म्हणाले.

रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्सचा वापर थांबवा, अशा सूचना राज्यांसबोत झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. जोपर्यंत आयसीएमआरकडून या टेस्ट किट्सची अचूकता आणि वैधता स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते वापरू नका असं आम्ही राज्यांना सांगितलं. बैठकीत सहभागी झालेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.

लॉकडाऊनचा निर्णय नोटाबंदीसारखाच, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

केंद्राचे पथक राजकीय व्हायरस पसरवण्यासाठी आले होत…

भारताने अलिकडेच चीनमधील दोन कंपन्यांकडून ५ लाख रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्स आयात केले होते. पण त्यातून अचूक निदान होत नसल्याने राज्यांनी केंद्राकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयसीएमआरचे डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी गेल्या मंगळवारी सर्व राज्यांना ही टेस्ट किट्स न वापरण्याची सूचना दिली होती. तसंच चौकशी करून दोन दिवसांनी नवीन दिशानिर्देश राज्यांना दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण अद्याप आयसीएमआरकडून टेस्ट किट्सच्या वापराबाबत कुठलीही नवीन सूचना आलेली नाही. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्सचा उपयोग हा करोनाचा प्रादुर्भाव किती झाला आहे, याची तपासणी करण्यासाठी केला जातो.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments