Home संपादकीय Ratnakar Matkari: त्या ऐसपैस घरात... - veteran marathi writer-playwright ratnakar matkari passes...

Ratnakar Matkari: त्या ऐसपैस घरात… – veteran marathi writer-playwright ratnakar matkari passes away


सुनिल कर्णिक

रत्नाकर मतकरी म्हणजे खरोखर ‘वन मॅन इंडस्ट्री’ होती. साहित्यिक, अभिनेता, नाट्यनिर्माता, चित्रपट दिग्दर्शक, बॅकस्टेज आर्टिस्ट, चित्रकार, चळवळीतील कार्यकर्ता, भाष्यकार आणि असंख्य पुरस्कारांचे मानकरी!

त्यांची बैठकीची खोली लहानमोठ्या पदकांनी, ढालींनी आणि सन्मानचिन्हांनी खच्चून भरलेली असे. पण ते स्वतः – आणि त्यांचे कुटुंबीयही – या सगळ्याच्या पलीकडे गेलेले होते. विख्यात समीक्षक माधव मनोहर हे त्यांचे सासरे, पत्नी प्रतिभाताई, चिरंजीव गणेश आणि कन्या सुप्रिया- हे सारेच आपल्या स्वतंत्र प्रज्ञेने नामवंत. त्यामुळे त्या ऐसपैस घरात येणाऱ्या-जाणाऱ्यांची सतत वर्दळ. चहापाण्याचा राबता अखंड चालू. ‘या रोजच्या धबडग्यात तुम्ही लिहिता तरी केव्हा?’ असं मी त्यांना एकदा विचारलं. त्यावर ‘रात्रीच्या निवांत वेळी,’ असं संक्षिप्त उत्तर मिळालं.

रात्रीही अनेकदा आमच्यासारखे नाठाळ लोक उशिरापर्यंत ठाण मांडून बसलेले असत. मध्यरात्री त्यांना उंबरठ्यापर्यंत सोडून आल्यावर मग ते लिहायला बसत. दैनिकांचं वाचनही रात्रीच. ‘मग तुम्ही इतरांची पुस्तकं वाचता तरी कधी?’ असं विचारलं की ते हसत हसत सांगत, ‘त्याची एक गंमतच आहे. कोणाचंही पुस्तक वाचायला घेतलं की थोड्याच वेळात मला त्यावरून काही तरी सुचायला लागतं… मग ते पुस्तक बाजूलाच पडतं!’
असं करत करत त्यांनी जवळ जवळ दीडशे पुस्तकं लिहिली होती!

दुसरीकडे शिवाजी पार्कच्या तरण तलावात नियमित पोहायला जात आणि बँकेची नोकरी दीर्घकाळ केली ते वेगळंच. प्रतिभाताई या होम मिनिस्टर, खासगी सचिव, चोवीस तास डयूटीवर आणि चौफेर संचार…

एक गोष्ट ते नेहमी बोलून दाखवत की ‘आयुष्यात मला जवळचा मित्र मिळाला नाही.’ हा विक्रम आम्ही मित्रांनी मोडला. जणू कट करून अलगद त्यांच्या पोटात शिरलो! डॉ. कृष्णा नाईक, डॉ. सुधाकर आजगावकर, प्रवीण धोपट आणि मी. आम्हाला त्यांच्या घरी मुक्तद्वार असे. खाण्यापिण्याची रेलचेल, जमिनीवर पाय पसरून कसेही बसा आणि बिनधास्त काहीही बोला! मी मर्यादा सोडून थोडा उद्धटपणा करत असे. आता आठवलं की थोडं ओशाळायला होतं.

पण या आमच्या बेबंद मैत्रीमधेच त्यांच्या अफाट पत्र-संग्रहाची आखणी झाली, संहिता शिस्तशीर लावून झाल्या, गौरवग्रंथ हातावेगळा झाला, चित्रमय चरित्र (फोटो बायोग्रफी) आकाराला आलं, ‘सांगोपांग लोककथा ७८’ प्रकाशकांकडे रवाना झालं आणि त्यांचं समग्र बालसाहित्य मार्गी लागलं. यातल्या काही पुस्तकांचं संपादन त्यांनी अगत्याने माझ्याकडे सोपवलं.
‘पॉप्युलर’चे रामदास भटकळ, अभिनेते दिलीप प्रभावळकर, कार्यकर्ते संजय मं. गो., नागपूरचे रवींद्र रु. पं., दिग्दर्शक विजय केंकरे, समीक्षक सुधा जोशी, चित्रकार सतीश भावसार, संगमनेरच्या प्रा. निशा शिवुरकर, पत्रकार कमलाकर नाडकर्णी, संपादक निखिल वागळे, ग्रंथालय चळवळीचे प्रदीप कर्णिक, अशा अनेकांशी त्यांचा नित्याचा संपर्क असे. त्या सर्वांना आणि मतकरींच्या अगणित चाहत्यांना त्यांचा वियोग कायमच जाणवत राहील.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jalyukt shivar latest news: Jalyukt Shivar Probe: ‘जलयुक्त शिवार’ची माहिती कोण लपवतंय?; ‘या’ जिल्ह्यात अधिकाऱ्यांची झाडाझडती – jalyukt shivar inquiry committee warned the officers

हायलाइट्स:फडणवीसांच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीला वेग.चौकशी समिती नगर जिल्ह्यात घेत आहे कामांची माहिती.प्रशासनातील अनागोंदी समोर आल्याने समिती अध्यक्ष संतापले.नगर:देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...

new farm laws: farm laws : निवडणुकांमधून जनतेचे नवीन कृषी कायद्यांवर शिक्कामोर्तब, भाजपचा दावा – people support new farm laws in elections says prakash...

नवी दिल्लीः गुजरातमधील महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. नव्या कृषी कायद्यांना ( new farm laws ) शेतकरी आणि...

Recent Comments