वाचा- ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवणारा भारतीय कोच; पाहा व्हिडिओ!
कसोटी क्रिकेटच्या १४३ वर्षाच्या इतिहासात अन्य कोणत्याही गोलंदाजाला करता आली नाही अशी कामगिरी रवी शास्त्री यांच्या नावावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध १९८०-८१ साली वेलिंग्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यात रवी शास्त्री यांनी चार चेंडूत ३ विकेट घेतल्या होत्या. अशी कामगिरी करणारे ते एकमेव गोलंदाज आहेत. यातील विशेष बाब म्हणजे शास्त्री यांचा हा पहिला कसोटी सामना होता आणि पहिल्याच सामन्यात ते हॅटट्रिकवर होते.
वाचा- १०व्या क्रमांकावर पदार्पण करणारा भारताचा ओपनर!
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार सुनिल गावस्कर यांनी जखमी झालेल्या दिलीप दोषी यांच्या ऐवजी रवी शास्त्री यांना संघात घेतले. गावस्कर यांनी शास्त्रींकडून गोलंदाजी करवून घेतली. पहिल्याच कसोटी सामन्यात शास्त्री यांनी कर्णधाराचा विश्वास जिंकला. या सामन्यात फक्त ३ षटक टाकणाऱ्या शास्त्री यांनी ९ धावात तीन विकेट घेतल्या.
वाचा- शास्त्री म्हणाले, या दोघांसोबत बिअर प्यायची आहे
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच सामन्यात अशी कामगिरी करणारे ते एकमेव गोलंदाज आहेत. शास्त्रींसारखी कामगिरी पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने दोन वेळा केली आहे. पण तो त्यांचा पहिला सामना नव्हता. ४ चेंडूत ३ विकेट दोन वेळा घेणारे अक्रम एकमेव गोलंदाज आहेत. १९९०-९१ साली प्रथम वेस्ट इंडिज आणि त्याच वर्षी इंग्लंडविरुद्ध अक्रमने ४ चेंडूत ३ विकेट घेतल्या होत्या.
हे देखील वाचा-
सचिनचा डुप्लिकेट; आधी नोकरी गेली आता करोना पॉझिटिव्ह
१९८३चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पार्टीचे पैसे कोणी दिले?