Home क्रीडा ravinder dandiwal: आंतरराष्ट्रीय 'मॅच-फिक्सिंग'चे रॅकेट; मास्टरमाइंड भारतीय! - ravinder dandiwal who was...

ravinder dandiwal: आंतरराष्ट्रीय ‘मॅच-फिक्सिंग’चे रॅकेट; मास्टरमाइंड भारतीय! – ravinder dandiwal who was indulged in international fixing racket bcci keeping eye on


नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियन पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ‘मॅच-फिक्सिंग’चे रॅकेट चालविणाऱ्या एका व्यक्तीची ओळख पटविली असून, ही भारतीय व्यक्ती रवींदर दांडीवाल आहे. व्हिक्टोरिया पोलिसांनी रवींदरला या रॅकेटचा मास्टरमाइंड म्हटले आहे. त्याच्यावर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळही (बीसीसीआय) लक्ष ठेवून आहे.

वाचा- गावस्करांनी असे का केले? उत्तर फक्त त्यांनाच माहीत!

मोहालीच्या रवींदरने अनेक आंतरराष्ट्रीय टेनिस लढती फिक्स केल्या आहेत. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख अजितसिंग म्हणाले, की आम्ही त्याच्यावर थेट कारवाई करू शकत नाही. कारण, त्याचा अद्याप तरी क्रिकेटमधील आमच्या अधिकृत सामन्यांत थेट संबंध आढळून आलेला नाही. असा संबंध असेल, तरच आम्हाला कारवाई करता येते. रवींदरला चंडिगडच्या क्रिकेट वर्तुळात चांगली ओळख मिळाली आहे. बीसीसीआयची परवानगी नसलेल्या अनेक खासगी लीग त्याने येथे आयोजित केल्या आहेत. अजितसिंग म्हणाले, की दोन-तीन वर्षांपूर्वी त्याला भारतात लीग भरवायची होती. मात्र, आमच्या पथकाने त्याचे हे मनसुबे उधळून लावले होते. म्हणूनच त्याने भारताबाहेर आपले जाळे पसरायला सुरुवात केली.

वाचा- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराक्रम; स्वत:च्या देशाचे स्पेलिंग चुकीचे लिहले!

दोन वर्षांपूर्वी त्याचा संबंध अफगाणिस्तान प्रीमियर लीगशीही आला होता. मात्र, तेदेखील आमच्या अखत्यारीत येत नाही. दोन-तीन वर्षांपूर्वी नेपाळमध्येही काही लीग आयोजित करण्यात त्याचा सहभाग होता. बँकॉकमध्येही त्याचे नाव समोर आले होते. फिक्सिंगसंदर्भात एखाद्या भारतीय खेळाडूंच्या संपर्कात येण्याचा त्याने प्रयत्न केला, तर त्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सुदैवाने अद्याप तसे काही घडलेले नाही. ऑस्ट्रेलिया किंवा इजिप्तमध्ये काही झाले असेल, तर ते भारतीय पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत नाही.

वाचा- सर्वाधिक चेंडू खेळलेले टॉप ५ फलंदाज; हा भारतीय अव्वल स्थानी!

सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड या वृत्तपत्रानुसार मूळचे भारतीय असलेले आणि सध्या मेलबर्नमध्ये स्थायिक असलेले राजेशकुमार आणि हरसिमरतसिंग यांना गेल्या आठवड्यात मेलबर्न कोर्टात हजर करण्यात आले होते. यांच्यावर २०१८मधील ब्राझील आणि इजिप्तच्या टेनिस स्पर्धेत फिक्सिंगचे आरोप आहेत. यांच्याकडूनही रवींदरचे नाव समोर आले होते. अजितसिंग म्हणाले, की आम्ही काही पोलिस नाहीत. बीसीसीआयच्या अखत्यारीत काम करतो. त्यांचे भ्रष्टाचार विरोधी नियमाचे पालन करतो. खेळाडू, ग्राउंड स्टाफ, अधिकारी, संघ व्यवस्थापक, सहायक वर्ग यांच्यापैकी कोणी जर फिक्सिंगशी संबंधीत असेल, त्याच्यावरच आम्ही कारवाई करू शकतो. अन्यथा रवींदरसारख्या व्यक्ती आमच्या या लोकांच्या संपर्कात तर नाहीत ना, यावर लक्ष ठेवू शकतो.

हे देखील वाचा-
धक्कादायक खुलासा; ‘या’ कर्णधाराने सचिन, सौरवला वर्ल्ड कप खेळण्यापासून रोखले!
भारतीय खेळाडूकडे IPLच्या ऑल टाइम संघाचे नेतृत्व!
भारताच्या माजी क्रिकेटपटूचे करोना व्हायरसने निधन!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Suraj Pe Mangal Bhari Movie Trailer – सूरज पे मंगल भारी ट्रेलर: लोटपोट व्हायला भाग पाडेल मनोज बाजपेयी आणि दिलजीत दोसांजचा कॉमक अंदाज

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मनोज बाजपेयी, दिलजीत दोसांज आणि फातिमा सना शेख यांच्या आगामी 'सूरज पे मंगल भारी' सिनेमाची चर्चा होती. यंदा दिवाळीत...

Trimbakeshwar: त्र्यंबकेश्वरच्या माजी नगराध्यक्षांची दिवसाढवळ्या हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ – nashik trimbakeshwar former mayor murdered broad daylight

त्र्यंबकेश्वर (नाशिक): त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची येथील एका युवकाने सुरीने गळा चिरून हत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येच्या घटनेने त्र्यंबकेश्वरसह...

hathras gangrape case: ​हाथरस गँगरेप : फॉरेन्सिक रिपोर्टवर प्रश्न; दोन डॉक्टरांनी गमावली नोकरी – Aligarh Doctor Azim Malik Who Questioned Fsl Report In Hathras...

अलीगढ, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या चर्चित हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दलित तरुणीच्या 'फॉरेन्सिक अहवाला'वर (FSL Report) प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अलीगढच्या...

Recent Comments