Home क्रीडा ravindra jadeja: सचिन,विराट, धोनी नव्हे तर 'हा' आहे भारताचा मैल्यवान खेळाडू! -...

ravindra jadeja: सचिन,विराट, धोनी नव्हे तर ‘हा’ आहे भारताचा मैल्यवान खेळाडू! – all-rounder ravindra jadeja named as most valuable test player of india of 21st century


नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमधील सर्वात मैल्यवान खेळाडू कोणता असा प्रश्न जर चाहत्याना विचारला तर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी, सुनिल गावस्कर, कपिल देव अशी नवे समोर येतील. या सर्वांना मागे टाकात एका दुसऱ्याच खेळाडूने २१ व्या शतकातील सर्वात मैल्यवान खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की सचिन किंवा अन्य खेळाडूंपेक्षा असा कोण आहे जो मैल्यवान आहे. तर जाणून घेऊयात या मैल्यवान खेळाडूबद्दल…

वाचा- या भारतीय खेळाडूचे कॅच पाहा; तुम्ही जॉन्टी र्‍होड्सला विसरून जाल!

भारतीय क्रिकेट संघातील २१व्या शतकातील सर्वात मैल्यवान खेळाडू म्हणून विस्डेन अष्ठपैलू रविंद्र जडेजा याची निवड केली आहे. विस्डेनने गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये दिलेल्या योगदानाचा विचार करून जडेजाची निवड केली आहे.

जगातील मैल्यवान खेळाडूंची यादी विस्डेनने जाहीर केली आहे. यात ३० जणांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जडेजाच्या कामगिरीचा विचार करून त्याला या यादीत दुसरे स्थान देण्यात आले आहे. तर श्रीलंकेच्या मुथ्थया मुरलीधरनला पहिले स्थान देण्यात आले आहे.

वाचा- करिअरमध्ये एकही नो बॉल न टाकलेल्या गोलंदाजांमध्ये एक भारतीय!

वनडे क्रिकेटचा विचार केल्यास इंग्लंडचा अष्ठपैलू अँड्य्रू फ्लिंटॉफ अव्वल स्थानी असून बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत अनेक ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंना स्थान मिळाले आहे. पण त्याच बरोबर अनेक मोठ्या खेळाडूंची नावे गायब आहेत. यात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार जेम्स अॅडरसन यांचा समावेश नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीला १८व्या तर वनडे ८व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. तर सचिनला वनडेत २२वे स्थान दिले गेले आहे. भारताचा फिरकीपटू आर.अश्विनला कसोटीत ८व्या स्थानावर आहे.

वाचा- क्रिकेटमधील सर्वात महाग ४ कॅच; टीम इंडियाला मिळाली एवढी मोठी शिक्षा!

ही यादी विश्लेषण करणाऱ्या क्रिकविज कंपनीने तयार केली आहे. यासाठी प्रत्येक खेळाडूला एक खास एमव्हीपी रेटिंग देण्यात आले. तुम्हाला रविंद्र जडेजाला भारताचा नंबर वन खेळाडू म्हणून यादीत पाहिल्यानंतर धक्का बसेल. पण गोलंदाजी सोबत तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि सामन्यात महत्त्वाचे योगदान देतो, असे क्रिकविजचे फ्रेडी वाइल्ड यांनी विस्डेनला सांगितले.

वाचा- भारताकडून वनडेतील पहिले ऐतिहासिक शतक; थेट नाबाद १७५ धावा!

जडेजाची गोलंदाजीतील सरासरी २४.६२ इतकी आहे जी शेन वॉर्नपेक्षा चांगली आहे. वॉर्नची सरासरी ३५.२६ इतकी आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतील अंतर १०.६२ इतके असून जे या शतकात खेळणाऱ्या अन्य कोणत्याही खेळाडूंपेक्षा अधिक आहे. ज्यांनी १ हजारपेक्षा अधिक धावा आणि १५० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. तो एक दर्जेदार अष्ठपैलू खेळाडू आहे.

टी-२० क्रिकेटचा विचार केल्यास अफगाणिस्तानचा कर्णधार रशिद खान क्रमांक एकवर आहे. लेग स्पिनर रशिद खानने खुप प्रभावित केले असून दुसऱ्या स्थानावर जसप्रित बुमराह, तिसऱ्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

Recent Comments