Home संपादकीय Ravivar MATA News : संकट की संधी? - opportunity for crisis?

Ravivar MATA News : संकट की संधी? – opportunity for crisis?


करोना साथीमुळे पर्यटन क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. जगात मंदीची लाट येऊ घातली असून, त्याचा फटकाही पर्यटनाला बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे.

नितीन शास्त्री

अमेरिकेतील एका प्रथितयश माध्यमाने १९९९मध्ये अमेरिकेत एक मोठे सर्वेक्षण केले होते. २०व्या शतकातील कोणत्या घटनांनी जगावर महत्त्वाचे परिणाम केले त्याची क्रमवारी या माध्यमांनी लावली होती. त्या वेळी ७१ टक्के लोकांनी ‘दुसरे महायुद्ध’ या घटनेला पहिल्या क्रमांकाची पसंती दिली होती. आज जर १९२०-२०२० या काळातील सर्वेक्षण करण्यात आले, तर बहुदा सध्या सुरू असलेल्या करोनाच्या साथीला पहिले स्थान मिळेल. दुसऱ्या महायुद्धानंतर जगावर अनेक नैसर्गिक आणि राजकीय आपत्ती आल्या. क्युबामध्ये १९६२मध्ये शीतयुद्ध उभे राहिले त्या वेळी काही क्षण असे आले की सारे जग श्वास रोखून राहिले होते. आजपर्यंतच्या जागतिक इतिहासात साथीच्या रोगांनी केलेल्या मनुष्यहानीचा आकडा पहिला, तर सहाव्या शतकातील प्लेगच्या साथीचा नंबर पहिला येईल. या साथीने फक्त युरोपमध्ये घेतलेले बळी १० कोटीच्या आसपास होते. भारताच्या बाबतीत बघायचे झाले, तर १९व्या शतकातील प्लेगच्या साथीने १ कोटीपेक्षा जास्त लोकांचे बळी गेले होते. थोडक्यात काय तर पृथ्वीवरच्या मानवाला नैसर्गिक आपत्तीचा सामना पुरातन काळापासून करावा लागत आहे. त्यावर मात करून मानवाने आपले अस्तित्व राखले आहे.

आज विज्ञानातील प्रगतीने आपण फार मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी निश्चितच रोखू यात वाद नाही. असे असतानाही २१व्या शतकाच्या केवळ दुसऱ्या दशकात घडलेल्या या साथीमुळे जगावर मोठे परिणाम होणार आहेत. याचे कारण या साथीमुळे झालेली जीवितहानी हे असणार नाही, तर या साथीमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर जे गंभीर परिणाम झाले आहेत ते असेल. आजपर्यंत न अनुभवलेली परिस्थिती आपण अनुभवत आहोत. जगभरातील जवळपास ८७ देशांतील सर्व उद्योगधंदे पूर्णपणे बंद आहेत. युद्धजन्य परिस्थितीत लावली जाणारी संचारबंदी सगळ्या जगाला अनुभवावी लागत आहे. अणुयुद्धाला घाबरून नव्हे, तर एका सूक्ष्म विषाणूला घाबरून जगभरात एक समान स्थिती निर्माण झाली आहे.

सर्व शिक्षण संस्था बंद आहेत, सरकारी, निम-सरकारी आस्थापने, खासगी कार्यालये दीर्घ मुदतीसाठी बंद ठेवण्यात आली आहेत; देशाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस आणि रेल्वे यार्डात आराम करीत आहेत. दिवसाला कित्येक टन दारूगोळा निर्माण करणाऱ्या कारखान्यांना सुट्टी मिळाली आहे. दिवसात शेकडो उड्डाणे करणाऱ्या सर्व विमान कंपन्या जमिनीवर आल्या आहेत. भारतात संपूर्ण लॉकडाउन जाहीर झाल्याने उद्योगधंदे ठप्प झाले आहेत आणि लवकरच त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसायला लागतील. अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पर्यटनासारख्या उद्योगाचे कंबरडे या संकटाने मोडले आहे.

गेली काही वर्षे पर्यटन क्षेत्राला कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत होते. तरीही हा उद्योग उभारी घेण्याचे संकेत दाखवत होता. पर्यटन उद्योग मूलतः आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्थिरतेवर अवलंबून असतो. आज जगात तीस लाख लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. हा आकडा प्रत्येक दिवशी वाढतोच आहे. करोनाच्या या सावटामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडलेला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे

अंदाजपत्रक आणि ताळेबंद बिघडलेला आहे. सगळ्यात मोठे आव्हान या साथीचे निर्मूलन झाल्यावर असणार आहे. सुमारे ४ कोटी २० लाख रोजगार निर्माण करणाऱ्या या उद्योगातील निम्मे रोजगार नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अशी भयावह स्थिती पहिल्यादांच निर्माण झाली आहे. जागतिक अर्थकारणामध्ये मंदीची लाट येऊ घातली आहे. आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेतला, तर अशा प्रकारच्या कोणत्याही मंदीचा थेट फटका

पर्यटन क्षेत्राला बसतो. भविष्यकाळात पर्यटनाचा बाज आमूलाग्र बदलेल असे संकेत आता मिळत आहेत.

येणाऱ्या काळात अनेक छोट्या आणि मध्यम प्रकारच्या ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर अंशतः किंवा पूर्णतः बंद पडण्याचा धोका आहे. या साथीचा प्रादुर्भाव परदेशातून झाल्यामुळे परदेशी प्रवाशांबद्दल एक प्रकारची भीती आपल्याला दिसून येणार आहे. देशी अथवा परदेशी पर्यटक ज्या ठिकाणी जास्त सुरक्षितता आहे आणि आरोग्याच्या सेवा जास्त चांगल्या मिळतात अशाच ठिकाणांना प्राधान्य देणार आहेत. परदेशी पर्यटनात सर्वांत जास्त टक्केवारी ही ६०पेक्षा अधिक वय असलेल्या पर्यटकांची असते. करोनासाथीमुळे या ज्येष्ठ नागरिकांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे आणि त्याचा परिणाम जागतिक पर्यटनावर होणार आहे. मात्र, देशांतर्गत पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार हे नक्की. करोना मुळे निर्माण झालेली ही परिस्थिती बदलायला पर्यटनातील तज्ज्ञ व्यक्तीच्या मते साधारणपणे दीड ते दोन वर्षे एवढा प्रदीर्घ काळ लागू शकतो. या काळात आपण काही आमूलाग्र बदल घडवून आणले, तर हे संकट आपण संधीमध्ये बदलू शकतो, असेही काहींना वाटते. असे घडल्यास या पर्यटनाचा वाटा जो या घडीला फक्त ३ टक्के आहे तो वाढू शकेल. पर्यटन क्षेत्राने असे अनेक धक्के या आधी पचविले आहेत. याचे मुख्य कारण हा व्यवसाय पूर्णपणे मानवी संबंधांवर अवलंबून आहे. २००९मध्ये जगभरात स्वाइन-फ्लूची साथ होती, त्या वेळी पहिले ३-४ महिने गर्तेत गेल्यावर जागतिक स्तरावर व्यवसाय सावरला. १९३०च्या जागतिक महामंदीमध्ये जेव्हा मोठमोठ्या कारखान्यांनी माना टाकल्या व दिवाळखोरी जाहीर केली, त्या वेळी ‘प्रॉक्टर अँड गॅम्बल’सारख्या कंपनीने कात टाकली. १९८०च्या दशकात इंग्लंडमधील ‘ब्रिटिश एअरवेज’ ही कंपनी जवळपास बंद होण्याच्या मार्गावर होती, ती १९९०ची सर्वोत्कृष्ट विमान कंपनी ठरली. असेच काहीसे भारतातील पर्यटनाबाबत झाले, तर आश्चर्य वाटू नये. अर्थात हे घडून येण्यासाठी व्यक्तिगत पर्यटकांची साथ मिळणे आवश्यक होणार आहे. आज या क्षेत्रातील प्रत्येक मध्यम स्तरावरील व्यावसायिक किमान ७-८ वर्षे या क्षेत्रात असतो. आपल्या उमेदीची वर्षे त्याने देशातील/परदेशातील सहलीचा व्याप सांभाळत काढलेली असतात. हा पर्यटन व्यावसायिक विमान कंपनी, बस कंपनी, हॉटेल मालक/चालक, गाइड या घटकांना एकत्र आणून तुमच्या वैयक्तिक अथवा ग्रुप सहलींना आपली सेवा देत असतो. आज लॉकडाउनने सर्वांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा वेळी पर्यटकांकडून सहकार्याची, सामंजस्यासची अपेक्षा तो बाळगून आहे. गेल्या काही काळात ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या बऱ्याच कंपन्या आल्या आहेत. आपली येथील तरुण पिढी तंत्रज्ञानामुळे या कंपन्यांकडे वळत आहे. परदेशी भांडवलावर आपल्या देशात व्यवसाय करणाऱ्या या कंपन्यांचा अनुभव अनेकांना चांगला आलेला नाही. या

ऑनलाइन कंपन्यांचे जे पेव फुटले आहे, त्याला पर्यटकांच्या साथीने आवर बसू शकतो. १०-१२ वर्षांपूर्वीपर्यंत जसा आपला फॅमिली डॉक्टर ठरलेला होता, तसाच ट्रॅव्हल एजंटही ठरलेला होता, हे मी स्वतः हे अनुभवले आहे. आजोबा आणि त्यांचा मुलगा सहज सांगायचे की आम्ही आमचा लग्नानंतरचा पहिला प्रवास तुमच्या मालकांच्या कंपनीमधून केला होता. तुमच्या सुट्ट्यांची आखणी व नियोजन करण्यासाठी त्या क्षेत्रातील अनुभव असलेलीच व्यक्ती हवी असते. तरुण पिढीला आपल्याकडे आज यंत्रापेक्षा माणसावर विश्वास ठेवा हे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे ती यामुळेच. केंद्र सरकार लवकरच पर्यटनाचे आपले नवीन धोरण जाहीर करेल, त्याला अनुसरून पर्यटकांनी जर या व्यावसायिकांना साथ दिली, तर संकटाचे रूपांतर संधीत होईल हे निश्चित.

(लेखक पर्यटन व्यावसायिक आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad district: मराठवाड्यात १८०० कोटींचे व्यवहार ठप्प – 100 per cent response to strike against gst act condition in aurangabad district

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'जीएसटी' कायद्यातील जाचक तरतुदींविरोधातील व्यापाऱ्यांच्या 'बंद'ला औरंगाबाद जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केवळ सरकारला जाग येण्यासाठी 'बंद'चे हत्यार उपसावे लागले....

Mumbai Public Schools: पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशांसाठी अर्जप्रक्रियेला सुरुवात – admission process started in cbse mumbai public schools of bmc

Admissions for BMC's Mumbai Public School: मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात ज्या मुंबई पब्लिक स्कूल्सची घोषणा केली, त्या दहा शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात...

Chitra Wagh: पवारसाहेब, आज मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून: चित्रा वाघ – pawar saheb i miss you very much since this morning says...

हायलाइट्स:'पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते', असे म्हणत आपले पती किशोर वाघ हे निर्दोष असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी...

petrol rate hike: पेट्रोल-डिझेल महागले; तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा झटका – petrol diesel rate hike today after three day pause

हायलाइट्स:पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा इंधन दरवाढ केली.याआधी सलग तीन दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते.आज पेट्रोल २४ पैसे आणि डिझेल १७...

Recent Comments