राज्यात करोनामृत्यूंचा नवा उच्चांक; आज २४५ करोनाबळी, ४८७८ नवे रुग्ण
ही कहाणी कोणा एका चित्रपटातील नाही. तर चक्क ससून रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेची कहाणी आहे. ससूनच्या अद्ययावत उपचारांवर या घटनेमुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. गीता (नाव बदलले आहे) यांचे वय ६५. त्या एकट्याच राहत होत्या. त्यामुळे मानसिक आणि शारिरीकरित्या त्यांची स्थिती बिघडलेली. त्यात गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात असतानाही त्या त्याच्याशी लढा देत होत्या. त्या अवस्थेत त्यांच्या मदतीला शेजारचे रहिवाशी धावून आले. त्यांनी त्यांना ससून रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात असताना रक्ताची नातीही दुरावली तिथे शेजारी मदतीसाठी धावले.
ठाण्यात २ ते १२ जुलैपर्यंत कडेकोट लॉकडाऊन; ‘हे’ आहेत नवे नियम
दरम्यान, राज्यात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आज राज्यात करोनामृत्यूंच्या संख्येनं नवा उच्चांक गाठला आहे. आज दिवसभरात २४५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, ४ हजार ८७८ नवे करोनारुग्ण वाढले आहेत.