Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल Redmi 10X: ५ मिनिटात विकले गेले १०० कोटी रुपयांहून अधिक फोन -...

Redmi 10X: ५ मिनिटात विकले गेले १०० कोटी रुपयांहून अधिक फोन – redmi 10x: redmi 10x phones worth more than rs 100 crore sold within 5 minutes


नवी दिल्लीः शाओमीच्या एका स्मार्टफोन्सला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. शाओमीच्या Redmi 10X च्या पहिल्या सेलमध्ये अवघ्या ५ मिनिटात १०० कोटी रुपयांहून अधिक जास्त फोनची विक्री झाली आहे. शाओमीचा Redmi 10X चा ५ जी आणि ४ जी व्हेरियंटचा चीनमध्ये पहिला सेल पार पडला. रेडमीकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विबो वर करण्यात आलेल्या पोस्टच्या माहितीनुसार, केवळ ५ मिनिटात १०० मिलियन युआन (१०६ कोटी रुपये) हून अधिक स्मार्टफोनची विक्री झाली आहे. एका रिपोर्टनुसार, शाओमीने या सेलमध्ये जवळपास ५० हजार Redmi 10X स्मार्टफोनची विक्री केली आहे.

वाचाः ‘मेड इन चायना’ फोन खरेदी करायचा नाही?, हे ‘टॉप १०’ ऑप्शन आहेत बेस्ट

Redmi 10X सीरिजमध्ये आहेत ३ स्मार्टफोन
रेडमीने आपल्या Redmi 10X सीरिजमध्ये Redmi 10X 4G, Redmi 10X 5G आणि Redmi 10X Pro 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. पहिल्या सेलमध्ये Redmi 10X 4G आणि Redmi 10X 5G स्मार्टफोनची विक्री करण्यात आली आहे. Redmi 10X Pro 5G स्मार्टफोन ६ जूनला पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. Redmi 10X च्या 5G आणि 4G वेरियंटमध्ये अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम ५ जी कनेक्टिविटी, इन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, ३.५ एमएम हेडफोन जॅक, आयआर ब्लास्टर, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

वाचाःचायनीज फोन खरेदी करायचा नाही?, हे पर्याय आहेत बेस्ट

फोनची किंमत
Redmi 10X च्या ४जी व्हेरियंटचा ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९९९ युआन (१० हजार ५०० रुपये), तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११९९ युआन (१२ हजार ६०० रुपये) तर Redmi 10X 5G स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५९९ युआन (१६ हजार ८०० रुपये), तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७९९ युआन (१९ हजार रुपये), ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २०९९ युआन (२१ हजार १५० रुपये) Redmi 10X 5G च्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २३९९ युआन (२५ हजार ३०० रुपये), Redmi 10X Pro 5G च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २३९९ (२५ हजार ३०० रुपये), तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २५९९ (२७ हजार ४०० रुपये) आहे.

वाचाःचायनीज अॅप्सची सुट्टी करायचीय?, आत्ताच करा इन्स्टॉल

वाचाःटाटा स्कायची सर्विस २ हजारांनी स्वस्त, ६ महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन

वाचाःबॅटरीतून निघाला धूर आणि जळायला लागला फोनSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

madhurta deshmukh: घरबसल्या गोष्टी ऐका आजी-आजोबांकडून – storyteller madhurata deshmukh is present stories for children under spin a yarn india using youtube and facebook

हर्षल मळेकर, मुंबईआजी-आजोबांच्या कुशीत शिरुन कोल्होबा, कावळा, सिंह-उंदिर यांच्या तसेच राम-कृष्णाच्या, बिरबलाच्या गोष्टी ऐकत झोपी जायचे हे भाग्य विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हल्ली फार...

Nitin Bhalerao Martyr: छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण – assistant commandant of crpf nitin bhalerao martyred, 9 injured in naxal...

नाशिक: छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले...

Recent Comments