तिरुवनंतपूरमः कुठल्याना कुठल्या वादामुळे चर्चेत असणारी कार्यकर्ता रेहाना फातिमाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फातिमाने आपल्या अर्धनग्न शरीराचे पेंटिग आपल्या अल्पवयीन मुलांना काढायला लावले. तसंच याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला. यावरून मोठा वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी रेहाना फातिमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रेहाना फातिमा ‘बॉडी अँड पॉलिटिक्स’ (शरीर आणि राजकारण ) या शिर्षकासह एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यादरम्यान बाल अधिकार संरक्षण मुद्द्यावरून केरळच्या राज्य आयुक्तांनी बुधवारी पतनमतिट्ठा जिल्ह्याच्या पोलिसांकडून या प्रकरणी १० दिवसांत अहवाल सादर करण्याच आदेश दिले आहेत.