Home देश पैसा पैसा reliance future group deal: मुकेश अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका; कोर्टाच्या 'या' निर्णयाने...

reliance future group deal: मुकेश अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका; कोर्टाच्या ‘या’ निर्णयाने वाढणार अडचणी – supreme court bars future group reliance deal on amazon appeal


हायलाइट्स:

  • रिलायन्स रिटेल आणि किशोर बियाणी यांच्या फ्युचर ग्रुपमधील व्यवहाराला आज सुप्रीम कोर्टात झटका
  • अॅमेझॉनच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
  • अॅमेझाॅन याचिका दाखल करून हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली

नवी दिल्ली :मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल आणि किशोर बियाणी यांच्या फ्युचर ग्रुपमधील व्यवहाराला आज सुप्रीम कोर्टात मोठा झटका बसला आहे. या व्यवहारावर जोरदार आक्षेप घेणाऱ्या अॅमेझॉनच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ज्यात लवादाला अंतिम निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टाने तूर्त मनाई केली आहे. याचिकाकर्ता अॅमेझॉनचे म्हणणे सुप्रीम कोर्ट ऐकून घेईल असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अॅमेझॉनच्या याचिकेला बळ आले आहे.

गलवानमधून चीनची माघारी ; सरकारची नरमाईची भूमिका, चिनी कंपन्यांच्या गुंतवणूक प्रस्तावाना मंजुरी
कर्जाच्या संकटात अडकलेल्या बियानी यांनी ऑगस्ट अखेरीस २४ हजार कोटींना रिटेल व्यवसाय रिलायन्सच्या ताब्यात दिला. बियाणी आणि अंबानी या दोघांच्यात झालेल्या करारानुसार किशोर बियाणी पुढील १५ वर्ष रिटेल व्यवसाय करू शकणार नाहीत अशा प्रकारची अट या करारात घालण्यात आली आहे.

करोना वाढला,बाजार कोसळला ; सेन्सेक्समध्ये १००० अंकांची घसरण, गुंतवणूकदार होरपळले
दरम्यान, गेल्याच महिन्यात भारतीय स्पर्धा आयोगाने रिलायन्सला फ्युचर ग्रुपची खरेदी करण्यास हिरवा कंदील दाखवला होता. अॅमेझॉनच्या हरकतीकडे दुर्लक्ष करत स्पर्धा आयोगाने रिलायन्स-फ्युचर ग्रुपमधील व्यवहाराला मान्यता दिली होती. यावरून संतापलेल्या अॅमेझाॅनने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टात अॅमेझाॅन याचिका दाखल करून हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे.

सोने तेजीत; आज महागले सोने आणि चांदी, जाणून घ्या आजचा दर
दरम्यान, सिंगापूर लवादाने या व्यवहारावर यापूर्वीच मनाई हुकूम जारी केला आहे. तर भारतीय नियंत्रकांनी व्यवहारावर शिक्कामोर्तब केले आहे. आता राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आजची सुप्रीम कोर्टाचे मत महत्वाचे मानले जात आहे.

सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की कोर्ट जोपर्यंत अॅमेझाॅनचे म्हणणे ऐकून घेत नाही तो पर्यंत लवादाने कोणताही अंतिम निर्णय देऊ नये. सिंगापूरमधील लवादाने ऑक्टोबरमध्ये या व्यवहारावर मनाई हुकूम जारी केला होता तो योग्य आहे, असा दावा अॅमेझॉनने केला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

जातपंचायतीची बहिष्कारनीती सुरूच

म. टा. प्रतिनिधी, समाजमनावरील जातपंचायतीची दहशत उधळून लावल्याची घटना म्हसरूळ (ता. नाशिक) येथे ताजी असतानाच आता सिन्नरमध्ये जातपंचायतीने तरुणावर बहिष्कार घातल्याचा धक्कादायक प्रकार...

औरंगाबाद : विनयभंगप्रकरणी तीन आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ऋषीकेश पालोदकर (२२, रा. पुंडलिकनगर), शुभम...

Mithun Chakraborty Joins BJP: कोलकात्यात PM मोदींची सभा; अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा भाजपमध्ये प्रवेश – actor mithun chakraborty joins bharatiya janata party at pms rally...

कोलकाताः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर जंगी सभा होत आहे. विशेष म्हणजे या सभेला भाजप नेत्यांसोबत ज्येष्ठ अभिनेते...

मेडिकल कॉलेजवरून मुख्यमंत्र्यांचा राणे यांना टोला, म्हणाले…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'आपण सत्ताधारी आहोत. आपल्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्यासोबत आहे. आपली सत्ता असूनही तुम्ही काहीही...

Recent Comments