Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल reliance jio: ८४ दिवसांची वैधताः या प्लानमध्ये सर्वात जास्त फायदा - jio,...

reliance jio: ८४ दिवसांची वैधताः या प्लानमध्ये सर्वात जास्त फायदा – jio, airtel and vodafone 84 days validity plan, know details


नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लानमध्ये मिळणारे फायदे लागोपाठ वाढवत आहेत. कंपन्या वेगवेगळ्या ग्राहकांच्या हिशोबाप्रमाणे नवीन प्लान आणत आहेत. रिचार्ज प्लान्समध्ये डेटा आणि कॉलिंग शिवाय दुसरे अन्य बेनिफिट्स दिले जातात. जर तुम्हाला तीन महिने (८४ दिवस) वैधतेचे रिचार्ज प्लान हवा असेल तर आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनमध्ये कोणता प्लान बेस्ट आहे. कोणत्या प्लानमध्ये सर्वात जास्त फायदे मिळतात यासंबंधी माहिती देत आहोत.

वाचाःशाओमी, रियलमी आणि सॅमसंग, २० हजारांपेक्षा कमी किंमतीतील १० फोन

व्होडाफोनच्या प्लानमध्ये ३३६ जीबी डेटा
व्होडाफोनकडे ६९९ रुपयांचा एक प्लान आहे. व्होडाफोनच्या या प्लानमध्ये डबल डेटा ऑफर अंतर्गत दुप्पट डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये दररोज ४ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना एकूण ३३६ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये युजर्संना कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग करता येते. तसेच १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जाते. तसेच या प्लानमध्ये ४९९ रुपयांचा व्होडाफोन प्ले आणि ९९९ रुपयांचा जी ५ फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

जिओच्या ८४ दिवसांच्या प्लानमध्ये २५२ जीबी डेटा
रिलायन्स जिओकडे ८४ दिवसांचे बरेच प्लान आहेत. परंतु, जिओचा ८४ दिवसांचा सर्वात जास्त २५२ जीबी डेटा ९९९ रुपयांच्या प्लान रिचार्जमध्ये मिळतो. जिओचा ९९९ रुपयांच्या प्लानमध्ये दर दिवशी ३ जीबी डेटा दिला जातो. या हिशोबाप्रमाणे एकूण २५२ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ कॉलिंग फ्री मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ३ हजार नॉन जिओ मिनिट मिळतात. युजर्संना दरदिवशी १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः नव्या रुपात येतोय नोकियाचा क्लासिक फोन

एअरटेल ८४ दिवसांच्या प्लानमध्ये १६८ जीबी डेटा
एअरटेलकडे ८४ दिवसांचे अनेक प्लान आहेत. परंतु, एअरटेलमध्ये ८४ दिवसांत सर्वात जास्त १६८ जीबी डेटा हा ६९८ रुपयांच्या प्लानमध्ये दिला जातो. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. या हिशोबाप्रमाणे एकूण १६८ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉ़लिंगचा फायदा मिळतो. तसेच दरदिवशी १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जाते. तसेच या प्लानमध्ये एअरटेल Xstream प्रीमियम आणि ZEE5 प्रीमियम चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

वाचाःशाओमी आणि ओप्पो चीनवरून मागवणार फोन, भारतात मोठी डिमांड

वाचाः BSNL युजर्ससाठी गुड न्यूज, २२ दिवसांपर्यंत ही सेवा फ्री



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

India Stands with France: ‘दहशतवादाविरोधातील लढाईत भारत फ्रान्ससोबत, हल्ल्यांचा निषेध’ – india stands with france in the fight against terrorism

नवी दिल्लीः फ्रान्समधील नाइस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासह नुकत्याच झालेल्या हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केला आहे. दहशतवादाविरूद्धच्या लढ्यात भारत फ्रान्ससोबत आहे, असं...

Recent Comments