Home आपलं जग करियर reopening of schools: मुंबईतील शाळांबाबत महापालिकेचा नवा आदेश - reopening of schools...

reopening of schools: मुंबईतील शाळांबाबत महापालिकेचा नवा आदेश – reopening of schools bmc education officer issues guidelines to schools


मुंबई जिल्हा हा करोना संक्रमणग्रस्तांच्या संख्येनुसार रेड झोनमध्ये येणारा जिल्हा आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतचा आदेश १५ जूनला जारी केला. रेड झोनसाठी स्वतंत्र आदेश निघणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान, शुक्रवारी १९ जून रोजी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मुंबईतील शाळांसाठी परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, मुंबईतील शाळा प्रत्यक्षपणे ३० जूनपर्यंततरी सुरू होणार नाहीत. शिक्षकांनी घरूनच शिकवण्याचे काम करायचे आहे.

परिपत्रक कोणत्या शाळांसाठी?

हे परिपत्रक मुंबई महापालिका क्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक आणि सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात विशेषकरून झोपडपट्टी भागात ८३३ कन्टेन्मेंट झोन आहेत, अशी माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू करणे मुंबईत तूर्त तरी अशक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पाठ्यपुस्तके कशी उपलब्ध करून द्यायची, त्याबाबतच्या सूचनाही पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी निर्गमित केल्या आहेत. या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

१) शाळेत प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचे वाटप पालकांना शाळेत टप्प्याटप्प्याने बोलावून व आवश्यक सुरक्षित अंतर ठेवून करावे. अपवादात्मक परिस्थितीत काही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तातडीने अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षीची (सेकंडहँड) पाठ्यपुस्तके संकलित करून द्यावीत. तसेच नजीकच्या काळात या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करावा. शाळेत मिळालेल्या पाठ्यपुस्तकांचे वाटप पालकांना करावयाचे असल्यामुळे मुख्याध्यापकांनी गरजेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शाळेत उपस्थित राहावे. आवश्यकता भासल्यास शिक्षकांना कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे.

हेही वाचा:पदवी परीक्षा: प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे

२) पुढील आदेश मिळेपर्यंत ई-लर्निंग सुविधेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरात राहून किंवा ऑनलाइन / डीजीटल (WhatsApp, Zoom App, Webinar, Telegram, Twitter आदि.) किंवा ऑफलाइन पद्धतीने शिक्षण द्यावे.

३) ३० जून २०२० नंतर करावयाच्या कार्यवाहीबाबत यथावकाश सूचना देण्यात येतील.

४) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरात राहून शिक्षण द्यायचे असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १५ जून ते ३० जूनपर्यंतचा कालावधी कर्तव्य बजावण्याचा आहे हे लक्षात घेऊन तशा नोंदी शालार्थ प्रणालीत कराव्यात.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai local: मोबाइल नाही तर लोकलप्रवास नाही ? – local passengers association ask question to state government over mumbai local entry

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनापूर्व काळात भिन्न आर्थिक स्थिती असलेले ८० लाख प्रवासी लोकलमधून प्रवास करत होते. यापैकी सगळ्यांकडेच अँड्राइड मोबाइल व इंटरनेटचे महागडे...

Recent Comments