Home शहरं मुंबई restraining order: राज्य सरकारच्या प्रतिबंधात्मक आदेशाला मुदतवाढ मिळणार? - coronavirus pandemic will...

restraining order: राज्य सरकारच्या प्रतिबंधात्मक आदेशाला मुदतवाढ मिळणार? – coronavirus pandemic will the restraining order be extended?


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाविषयी तसेच अन्य विषयांवर अपप्रचार व चुकीचा संदेश पोचवणारे आणि करोनाविरुद्धच्या लढ्यात सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांविषयी अविश्वास निर्माण करून लोकांचे जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारा प्रतिबंधात्मक आदेश मुंबई पोलिसांनी ८ जूनपर्यंतच्या कालावधीसाठी काढला होता. आता या आदेशाचा कालावधी यापुढेही वाढवला जाणार आहे का? किंवा पुन्हा तसा आदेश नव्याने काढण्याचा इरादा आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला करून २३ जूनपर्यंत उत्तर मागितले होते.

‘मुंबई पोलिसांच्या या २३ मे रोजीच्या आदेशाद्वारे सरकारवर टीका करणाऱ्यांनाही लक्ष्य केले जाऊ शकते. त्यामुळे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काचा भंग करणारे आहे. त्यामुळे हा मनमानी व जुलमी आदेश रद्द करण्याचा आदेश द्यावा’, अशा विनंतीची जनहित याचिका राजीव मिश्रा यांनी अॅड. डी. पी. सिंग यांच्यामार्फत केली आहे. मात्र, ‘समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक खोटे व चुकीचे संदेश, करोनाविषयी खोटी व चुकीची माहिती असलेले संदेश, सरकारच्या प्रयत्नांविषयी अविश्वास निर्माण करून लोकांचे जीव धोक्यात घालणारे संदेश व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, टिकटॉक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर पसरवले जात असल्याचे निदर्शनास आणल्याने हा प्रतिबंधात्मक आदेश काढला’, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.

या पार्श्वभूमीवर, न्या. उज्जल भुयान व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर हा विषय ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सुनावणीस आला असता, तो प्रतिबंधात्मक आदेश ८ जूनपर्यंतच होता, असे सरकारी वकील माधवी म्हात्रे यांनी सांगितले. तसेच या याचिकेला अर्थ उरला नसल्याने ती निकाली काढण्याची विनंती केली. मात्र, ‘त्या आदेशाची मुदत वाढवली जाणार आहे का? किंवा तसाच आदेश नव्याने काढला जाणार आहे का?’, अशी विचारणा खंडपीठाने केली. तेव्हा, याविषयी उत्तर देण्यासाठी मुदत देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केल्याने खंडपीठाने याचिकेवरील पुढील सुनावणी २३ जूनला ठेवली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

International Women’s Day 2021: घरखरेदीत पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर – 82 percent of women prefer to buy house for investment : anarock survey

म. टा. प्रतिनिधी, मुंबईविविध प्रकारच्या सवलतींच्या लाटेवर असलेल्या घरखरेदीचा आलेख मुंबईत सध्या चढता आहे. विशेष म्हणजे, घर खरेदीत पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. जिथे...

बुद्धिवान कलांवत :श्रीकांत मोघे

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अल्याड-पल्याड ज्या कलावंतांनी सांस्कृतिक महाराष्ट्र घडवला, मध्यमवर्गीयांच्या अभिरुचीला आकार दिला, त्या लेखक-दिग्दर्शक-कलावंतांच्या मांदियाळीतील एक अस्सल मोहरा म्हणजे . शहरी-ग्रामीण दोन्ही...

maharashtra budget 2021: राज्यासमोर आर्थिक संकट; ठाकरे सरकारपुढे आव्हान – maharashtra budget session 2021 : ajit pawar will submits the budget in the assembly

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना संसर्गाची धास्ती आणि टाळेबंदीमुळे गेले वर्षभर सामान्यांची घडी विस्कटली असून त्याचा परिणाम म्हणून राज्याचा महसूल घटला आहे....

Recent Comments