Home क्रीडा ricky ponting: आयपीएलनंतर भारताविरुद्ध रणनिती आखायला तयार झाला रिकी पॉन्टिंग, पाहा नेमकं...

ricky ponting: आयपीएलनंतर भारताविरुद्ध रणनिती आखायला तयार झाला रिकी पॉन्टिंग, पाहा नेमकं काय केलं… – after ipl 2020 ricky ponting is given practice to australians cricketers for series against india


सिडनी : आयपीएल संपल्यावर दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आता भारताविरुद्ध रणनिती आखायला तयार झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या नेट्समध्ये आता पॉन्टिंग नेमकं काय करत आहे, पाहा…

आयपीएल संपल्यावर पॉन्टिंग थेट ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये दाखल झाला. पॉन्टिंग बराच काळ ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सराव देन मार्गदर्शन करत आहे. त्याचबरोबर नेट्समध्ये पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना फलंदाजीचा सराव करून देत आहे. कोणत्या चेंडूवर कसे फटके आणि कुठे मारायचे, याचे मार्गदर्शन पॉन्टिंग करताना दिसत आहे. त्याचबरोबर भारताला पराभूत करण्यासाठी पॉन्टिंग रणनिती आखत असल्याचेही पाहायला मिळाले आहे.

पॉन्टिंग हा ऑस्ट्रेलियाच्या संघाचा मार्गदर्शक आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्याबरोबर पॉन्टिंग भारताला कसे पराभूत करता येईल, याची रणनिती आखत आहे. सध्याच्या घडीला पॉन्टिंग क्वारंटाइनमध्ये आहे. पण तरीही ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी पॉन्टिंग रोज मैदानात उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकवेळ खेळाडू थकत असले तरी पॉन्टिंग मात्र थकलेला दिसत नाही.

याबाबत ऑस्ट्रेलियाच्या संघातील अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसने सांगितले की, ” पॉन्टिंग एक खेळाडू म्हणून कसे होते, हे सर्वांनाच माहिती आहे. पण एक प्रशिक्षक म्हणूनही ते फारच चांगले आहेत. पॉन्टिंग तुम्हाला आत्मविश्वास देताात, त्याचबरोबर तुमचे नेमके कुठे चुकते आणि त्यासाठी काय करायला हवे, याचे मार्गदर्शनही करतात. त्यामुळे एक प्रशिक्षक म्हणून त्यांची कामगिरीही उत्तम आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता तेव्हा ते कसे प्रशिक्षक आहे, हे समजून चुकते.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Hasan Mushrif: गरिबांना मोफत उपचार द्यावे – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ – rural development minister hasan mushrif has directed charitable hospital should give free...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील गरीब रुग्ण शहरांमध्ये उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा...

vegetable sellers in mumbai: २० लाख कुटुंबे संकटात – 20 lakh families vegetable seller and workers in crisis due to discussion among people over...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई नगरीला धान्य व भाजीचा पुरवठा करण्यासाठी २० लाखांहून अधिक विक्रेते, कामगार मेहनत घेतात. आता पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाल्याने...

Recent Comments