Home देश पैसा पैसा RIL loses crown of top weighted Nifty50 stock: RIL Stock 'रिलायन्स'च्या शेअरचा...

RIL loses crown of top weighted Nifty50 stock: RIL Stock ‘रिलायन्स’च्या शेअरचा तोरा उतरला ; ‘ही’ आहेत त्या मागची कारणे – ril loses crown of top weighted nifty50 stock


मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांची श्रीमंतांच्या यादीत घसरण झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरवर देखील परिणाम झाला आहे. भांडवली बाजारात सर्वात महत्वाचा ब्लुचिप शेअर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने (RIL) निफ्टी-५० मधील अव्वल स्थान गमावले आहे.

सुवर्ण झळाळी ; आज पुन्हा सोने महागले, चांदी मात्र स्वस्त
निफ्टी-५० मंचावर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचे weightage मंगळवारी १०.०८ टक्के झाले. सोमवारी ते ९.८२ टक्के होते. मागील काही दिवसांत रिलायन्सच्या शेअरचे The stock’s weightage सातत्याने कमी झाले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची अव्वल स्थावरून घसरण झाली असून त्याजागी आता एचडीएफसी बँकेच्या शेअरची वर्णी लागली आहे.

Budget 2021 यंदा कर सवलती विसरा;’बजेट’मध्ये करदात्यांची होणार निराशा,तज्ज्ञांचे भाकीत
निफ्टी-५० वरील The stock’s weightage नुसार एचडीएफसी बँक १०.२६ टक्क्यांनी अव्वल स्थानी आहे. त्याखाली रिलायन्स इंडस्ट्रीज १०.०८ टक्के, इन्फोसिस ८.१ टक्के, एचडीएफसी ७.८६ टक्के आणि पाचव्या स्थानी ६.०२ टक्के weightage नुसार आयसीआयसीआय बँकेचा शेअर आहे.

गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या काळात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर चर्चेत होता. या काळात शेअर तब्बल १६९ टक्के वाढला. रिलायन्स समूहाची निधी उभारणी, जिओ मार्ट या ऑनलाइन पोर्टलचे अनावरण करून किराणा क्षेत्रात घेतलेला प्रवेश यामुळे कंपनीच्या शेअरला सुगीचे दिवस आले होते. रिलायन्स जिओच्या हिस्सा विक्रीतून तब्बल दोन लाख कोटींचा निधी उभारला होता.

पेट्रोल-डिझेल महागले ; मुंबईत पेट्रोल ९१ रुपयांवर, ग्राहकांचे कंबरडे मोडणार
या काळात ११ सप्टेंबर रोजी रिलायन्सच्या शेअरने २३६० रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. मात्र त्यानंतर शेअरला उतरती कळा लागली. एकीकडे निफ्टी-५० निर्देशांक २७ टक्क्यांनी वधारला असताना रिलायन्सच्या शेअरमध्ये १८ टक्के घसरण झाली. ज्यामुळे गुंतवणूकदारांना जबर झटका बसला.

रिलायन्सच्या शेअरमधील घसरणीची कारणे
– अॅमेझॉनच्या हरकतीमुळे रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपमधील व्यवहार बारगळला.

– युरोप आणि अमेरिकेत करोनाचे थैमान, पुन्हा लॉकडाउन, रिलायन्सच्या इंधन आणि ऊर्जा व्यवसायाला फटका

– दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा आणि स्पर्धक कंपन्यांनी घेतलेली उभारीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

India vs Australia Scorecard: Australia All Out On 294 Runs On Day 4 Of 4th And Final Test In Brisbane, India Required 324 Runs...

ब्रिस्बेन, IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा दिवस चांगलाच रंगतदार ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारताने ३०० धावांच्या आतमध्येच रोखले. मोहम्मद सिराजने...

Recent Comments