Home मनोरंजन Rishi Kapoor and Lata Mangeshkar: ऋषीजी तुम्ही पुनर्जन्म घ्या; लता दीदींचं भावुक...

Rishi Kapoor and Lata Mangeshkar: ऋषीजी तुम्ही पुनर्जन्म घ्या; लता दीदींचं भावुक ट्विट – veteran bollywood playback singer lata mangeshkar took to twitter & expressed her grief over rishi kapoor


मुंबई: हजारो चाहत्यांना पोरके करून प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर गुरुवारी अनंतात विलीन झाले. सदैव हसतमुख असलेले ऋषी कपूर हे चिंटू या टोपणनावानं ओळखले जात. त्यांच्या आठवणींचे गारुड त्यांच्या चाहत्यांच्या मनावर कायम राहणार आहे. त्यांच्या निधनानं केवळ चाहत्यांनाच नाही तर सिनेसृष्टीतल्या दिग्गज कलाकार मंडळींना देखील धक्का बसला आहे. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी ट्विट करून ऋषी कपूर यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्यात.

लता दीदी ऋषी कपूर यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही सावरल्या नाहीत. ऋषी कपूर तुम्ही पुनर्जन्म घेऊन परत या असंही त्या म्हणतायत. लता दीदींनी ‘ओम शांती ओम’ या गाण्याचा व्हिडिओ शेअर केलाय. त्यासोबत त्यांनी लिहीलेलं कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे. ‘ऋषीजी मला तुमची फार आठवण येतेय. असा विचार करणं वेडेपणाचं असू शकतं पण ‘कर्ज’ चित्रपटाप्रमाणे तुम्ही पुनर्जन्म घेऊन परत आलात तर किती बरं होईल’, असं लता दीदींनी म्हटलं आहे.

आपल्या मृत्यूबद्दलच्या ऋषी कपूर यांच्या गोष्टी झाल्या खऱ्या
दरम्यान, ऋषी यांच्या निधनानंतर लता दीदींनी एक खास फोटो शेअर करत ऋषी कपूर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता. आपल्या हातावर घेतलेल्या गोंडस लहानग्या ऋषी कपूर यांच्या फोटोसह, ‘काही दिवसांपूर्वीच ऋषींजींनी मला त्यांचा हा फोटो पाठवला होता. फोटोतला तो दिवस, त्यावेळच्या कितीतरी गोष्टींची आठवण येतेय. मी नि:शब्द झाले आहे,’ अशा भावना आपल्या ट्विटरवर व्यक्त केल्या होत्या.
बाबा, तुम्ही कायम आठवणीत राहाल; मिताली मयेकरची भावुक पोस्टSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

india pakistan news: India Slams Pakistan For Presenting Dossier Of Lies At Un – Pakistan Terrorism पाकिस्तानने अबोटाबाद लक्षात ठेवावे; भारताने सुनावले

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेले सर्वाधिक दहशतवादी आणि दहशतवादी संघटना पाकिस्तानात असल्याचे निक्षून सांगून 'पाकिस्तानच्या अबोटाबादमध्येच जगातील कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन दडून...

ajit pawar: मुख्यमंत्रिपदाचा योग कधी? अजित पवार म्हणाले… – what ajit pawar said on the question regarding cm post

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात शासकीय महापूजेसाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज पत्रकारांच्या एका अनपेक्षित प्रश्नाला सामोरं जावं लागलं. अर्थात, अजित पवार...

Recent Comments