Home मनोरंजन riteish deshmukh tweet migrants and workers: मजूरांच्या प्रवासाचा आपण खर्च करायलाच हवा;...

riteish deshmukh tweet migrants and workers: मजूरांच्या प्रवासाचा आपण खर्च करायलाच हवा; रितेशचं ट्विट – should bear the cost of migrants going back to their homes says riteish deshmukh


मुंबई: देशातील कामगार आणि मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी जीवाचं रान करावं लागत आहे. हजारो किमीची पायपीट करत घरी पोहोचण्याचा संघर्ष देशातील रस्त्यांवर पाहायला मिळतोय. याच संदर्भात अभिनेता रितेश देशमुख यानं एक ट्विट करत कामगार आणि मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मोफत रेल्वे सेवा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

रितेशनं यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ट्विट करत असताना त्यानं एक मन हेलावून टाकणारा फोटो शेअर केला आहे. यात एक व्यक्ती त्याच्या वृद्ध आईला कडेवर घेऊन पायी प्रवास करताना दिसतोय. ‘अडकून पडलेल्या मजूर आणि कामगारांच्या प्रवासाचा खर्च आपला देश करू शकतो. त्यांना ही सेवा मोफत द्यायला हवी. काम नसल्यानं आधीच ते होरपळले आहेत. त्यांना राहायला जागा ही नसल्यानं करोनाचा संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे’, असं त्यानं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं २४ मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन लागू केल्यापासून स्थलांतरीत मजूर त्या-त्या राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. राहण्याची, खाण्याची व्यवस्था नसल्यानं त्यांचे हाल होत आहेत. काम बंद असल्यानं पगार नाही त्यामुळं शहरात राहायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यामुळं या मजूरांनी आपल्या गावाकडं जाण्यासाठी पायपीट सुरू केली. मजूर आणि कामगार हजार-हजार किमीचा पायी प्रवास करत आपापल्या राज्यात जात आहेत. केंद्र सरकारतर्फे या मजूरांसाठी ‘श्रमिक रेल्वे’ सुरू केली त्यानंतर त्याच्या तिकीटाच्या पैशांवरून सध्या राजकारण सुरू आहे.

रेल्वे मंत्रालयाचं घुमजाव, मजुरांकडून पैसे घेतलेच नसल्याचा दावाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Indo Nepal border: नेपाळ पोलिसांकडून गोळीबार; एका भारतीयाचा मृत्यू, एक बेपत्ता – indian national killed, one missing after police firing by nepal police

हायलाइट्स:सीमेवर नेपाळ पोलीस आणि तीन भारतीय नागरिकांत बाचाबाचीएका भारतीय नागरिकावर नेपाळ पोलिसांचा गोळीबारझटापटी दरम्यान सीमा पार करण्यात यशस्वी ठरल्यानं एकाचा जीव वाचलातिसरा साथीदार...

All India Marathi Literary Meet: साहित्य संमेलन मेअखेरीस? – all india marathi literary meet program will be postpone in may month due to coronavirus

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशहरात २६ ते २८ मार्च या काळात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिनाअखेरपर्यंत पुढे ढकलण्याचा...

Violence against women: बलात्कारी डॉक्टर गजांआड – aurangabad municipal corporation has suspended to rapist doctor

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल महिलेला डिस्चार्ज देण्यासाठी केबिनमध्ये बोलावून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरला महापालिकेने गुरुवारी बडतर्फ केले. कोव्हिड केअर...

Recent Comments