Home क्रीडा robin uthappa: धक्कादायक! भारताचा विश्वविजयी क्रिकेटपटू करणार होता आत्महत्या - have battled...

robin uthappa: धक्कादायक! भारताचा विश्वविजयी क्रिकेटपटू करणार होता आत्महत्या – have battled suicidal thoughts, depression, said indian cricketer robin uthappa


भारताच्या विश्वचषक विजेत्या संघातील एक क्रिकेटपटू आत्महत्या करणार असल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. काही गोष्टींना कंटाळून त्याने हा निर्णय घेतला होता. पण आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या डोक्यात कसा आला, जाणून घेऊया…

हा खेळाडू दोन वर्षे त्रस्त होता. २००९ ते २०११ या दोन वर्षांच्या कालावधीत त्याला नैराश्याने ग्रासले होते. त्यामुळे या दोन वर्षांमध्ये आपण बाल्कनीमधून उडी मारून आपले जीवन संपवून टाकावे, असे विचार त्याच्या मनात येत होते, असे या क्रिकेटपटूने सांगितले होते.

हा खेळाडू आहे तरी कोण…
भाराताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकात महत्वाची कामगिरी बजावली होती ती भारताच्या रॉबिन उथप्पाने. एका मुलाखतीमध्ये रॉबिन म्हणाला की, ” माझ्या आयुष्यातील दोन वर्षे फारच वाईट गेली. या दोन वर्षांत मी बाल्कनीमधून उडी मारून आत्महत्या करावी, असे वाचर माझ्या मनात येत होते. त्यावेळी मी क्रिकेटचाही विचार करत नव्हतो. हे दिवस फारच वाईट होते.”

हे होते आत्महत्येचेकारण…
आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण काय होते, याबाबत रॉबिन म्हणाला की, ” मी माझ्या खेळावर भरपूर मेहनत घेत होतो. त्याचबरोबर मैदानात घामही गाळत होतो. पण माझ्या धावा काही जास्त होत नव्हत्या. त्यामुळे नेमके काय करावे, हे मला समजत नव्हते. या काळात माझी मानसीकता चांगली राहिली नाही आणि माझ्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येऊ लागले होते.”

रॉबिन भारताकडून ४६ एकदिवसीय सामने खेळला आहे, त्याचबरोबर १३ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधीत्वही केले आहे. रॉबिन पुढे म्हणाला की, ” आत्महत्येचा विचार दूर करण्यासाठी मी काही गोष्टींना सुरुवात केली. मी रोज डायरी लिहायला लागलो. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून मी नेमका कसा आहे, याचा उलगडा मला नव्याने होत गेला. त्याचबरोबर मी क्रिकेटचा विचार करायला सुरुवात केला. या गोष्टींमुळे मी आत्मटहत्या करण्यापासून परावृत झालो.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sujay vikhe patil: ‘शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर? हे जनतेनेच ठरवावे’ – bjp mp sujay vikhe clears stand on k k range issue

अहमदनगर: ‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता शरद...

sujay vikhe patil: ‘मी भाजपमध्ये नवीन आहे; खडसेंबद्दल काय बोलणार?’ – how can i comment on eknath khadse, says bjp mp sujay vikhe patil

अहमदनगर: 'भारतीय जनता पक्षात मी नवीन आहे. मला एकच वर्ष झालं आहे. त्यामुळं ४० वर्षे पक्षात असलेल्या व्यक्तीवर मी टीकाटिप्पणी काय करणार,' अशी...

Recent Comments