Home महाराष्ट्र Rohit Pawar Attack Gopichand Padalkar: आजोबांवरील टीकेला रोहितदादांचे खास 'पवार स्टाइल' उत्तर...

Rohit Pawar Attack Gopichand Padalkar: आजोबांवरील टीकेला रोहितदादांचे खास ‘पवार स्टाइल’ उत्तर – NCP Mla Rohit Pawar Attacks Bjp Mla Gopichand Padalkar For Criticising Sharad Pawar


मुंबई: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर पवारांचे नातू व आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘खालच्या पातळीवरचं हे राजकारण पाहिलं की दु:ख होतं आणि चीडही येते. पण त्यात लोकांचा फायदा नाही म्हणून आम्ही त्याकडं दुर्लक्ष करतो,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. (Rohit Pawar slams Gopichand Padalkar)

वाचा: ‘पडळकर पवारांबद्दल असं का बोलले हे समजून घ्यायला हवं’

‘शरद पवार यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला असून छोट्या समूहाला भडकवण्याचं काम केलं आहे. पवार हे महाराष्ट्राला लागलेले करोना आहेत’, अशी टीका पडळकर यांनी पंढरपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत केली होती. पडळकरांच्या या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित यांनीही यावर भाष्य केलं. ‘लोकप्रिय नेत्याबद्दल उलटसुलट बोललं की राजकीय प्रसिद्धी मिळते, असं काही लोकांना वाटतं. टीव्हीवर व वर्तमानपत्रात येण्यासाठी हे केलं जातं. पण या राजकारणाचा लोकांना काही फायदा नसतो. त्यामुळं आम्ही सर्वच जण त्याकडं दुर्लक्ष करतो,’ असं ते म्हणाले.

शरद पवार हे गेल्या ५५ वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहेत. लोकांसाठी काम करताहेत. लोकांच्या मनात आहेत. ज्या लोकांना काही काम नाही, तेच शरद पवारांच्या बदनामीसाठी हे प्रयत्न करत आहेत. शरद पवारांनी जितकी वर्षे काम केलंय, तितकं याचं वयही नाही,’ असा टोला रोहित यांनी पडळकर यांना हाणला.

वाचा: तू पेपर वाचत नाहीस का; आव्हाडांनी अक्षय कुमारला खिंडीत गाठले

‘पडळकरांचं वक्तव्य हे पूर्णपणे राजकीय होतं. पडळकर ज्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांना ज्यांनी आमदार बनवलं त्यांनीच हे वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगितलं. त्यांनीच पडळकरांची चूक दाखवून दिली. मग आता आम्ही वेगळं काय बोलणार,’ असंही रोहित पवार म्हणाले.

पडळकरांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताच काल भाजपनं त्यांच्यापासून हात झटकले होते. ते पडळकरांचं वैयक्तिक मत होतं, असं भाजपनं सांगितलं होतं. अर्थात, ते चुकीचं असल्याचंही पक्षानं स्पष्ट केलं होतं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE: नाकावाटे दिली जाणार कोरोना लस, नागपूरसह देशभरात 4 ठिकाणी चाचणी सुरू | Coronavirus-latest-news

7:36 am (IST) कोरोना लस आता नाकावाटे देण्याबाबत देशात चार ठिकाणी चाचणी सुरू राज्यात नागपूरच्या गिल्लूरकर हॉस्पिटल मध्ये चाचणी...

Sharjeel Usmani: गुन्हा रद्द करण्याची शर्जील उस्मानीची मागणी – elgar parishad 2021: sharjeel usmani moves bombay high court to quash fir against hime

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपुण्यातील एल्गार परिषदेतील भाषणात आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल पोलिसांनी अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर...

Recent Comments