Home क्रीडा Rohit Sharma: करोना व्हायरस देतोय एक पॉझिटिव्ह मेसेज, तुम्हाला समजला का... -...

Rohit Sharma: करोना व्हायरस देतोय एक पॉझिटिव्ह मेसेज, तुम्हाला समजला का… – corona virus is given a positive message, said rohit sharma


करोना व्हायरसचं नाव ऐकल्यावर काही जणांचा थरकाप उडतो. जगभरात करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे करोना व्हायरस हे सकारात्मक संदेश देत आहे, असे ज तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. कारण एवढी भयावह परिस्थिती ज्या एका व्हायरसमुळे निर्माण झाली तो एक सकारात्मक संदेश कसा देऊ शकतो, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.पण ज्या काही गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठीच असतात, असा मानणारा एक वर्ग आहे. या वर्गातील एका जगप्रसिद्ध व्यक्तीने करोना कसा आणि कोणता सकारात्मक संदेश देत आहे, याबद्दल भाष्य केल्याचे पाहायला मिळत आहे. पण एका क्रिकेटपटूने मात्र याबाबतचा अर्थ उलगडून सांगितला आहे. त्यामुळे हा करोना व्हायरस नेमका कोणता सकरात्मक संदेश देत आहे, ते पाहूया…

विश्वास बसत नसेल, तर फक्त एकदा वाचा…

करोना व्हायरसचे थैमान सध्याच्या घडीला जगभरात सुरु आहे. जगभराील लोकं या करोना व्हायरसमुळे हैराण झाली आहेत. त्यामुळे काही जणं या व्हायरसला दुषणंही देत आहेत. त्याचबरोबर हा व्हायरस ज्या चीनने पसरवला त्यांच्याबरोबर संबंध तोडण्याचा विचारही सुरु आहे. कारण करोना व्हायरसमुळे जवळपास सर्वच देशात भयावह वातावरणा निर्माण झाले आहे, त्याचबरोबर या व्हायरसचे कोणतेही औषध आलेले नाही. पण करोना व्हायरसमध्ये एक सकारात्मक संदेश लपलाय, असं जर तुम्हाला सांगितलं तर…

करोनाचे जगभरात थैमान…

maharashtra times

जगभरात जवळपास ४६ लाख लोकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. यापैकी जवळपास ३ लाख ११ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर १७ लाख लोकांकावर यशस्वी उपचार झाले आहेत. भारतामध्येही करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. कारण भारतात जवळपास ९० हजार लोकांना करोना व्हायरसची बाधा झाली आहे, तर २,८७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील ३४ हजार लोकांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहे, तर ५६ हजार लोकांवर उपचार सुरु आहेत.

करोनाने एक साकारात्मक संदेश दिलाय…

maharashtra times

जगभरात लाखो लोक करोना व्हायरसमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे करोना व्हायरसमध्ये एखादा सकारात्मक संदेश असेल, असे तुम्हाला वाटत नसेल. सध्याच्या घडीला बरीच लोकं आपल्या घरी आहेत, जास्त वाहनं रस्त्यावर दिसत नाहीत. त्यामुळे बऱ्याच गोष्टीची बचत झालेली पाहायला मिळत आहे. तुम्ही काही गोष्टी पाहिल्या तर त्यामध्ये बदल झालेले पाहायला मिळत आहे. प्रदूषण कमी झाल्यामुळे आकाश निरभ्र दिसत आहे. त्याचबरोबर निसर्गामध्ये सकारात्मक बदलही झालेले आहेत.

रोहितला समजला सकारात्मक संदेश…

maharashtra times

करोना व्हायरसने एक सकारात्मक संदेश दिला आहे, असे मत भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने व्यक्त केले आहे. करोना व्हायरसमुळे नेमके काय सकारात्मक बदल पाहायला मिळालेले आहेत, याबाबत रोहितने आपले मत व्यक्त केले आहे. रोहितने याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रोहित जे काही म्हणाला आहे, ते वाचल्यावर तुम्हालाही ही गोष्ट पटेल. करोना व्हायरसमध्ये काय सकारात्मक आहे, याबद्दल रोहितने नेमके काय सांगितले आहे ते जाणून घेऊया…

रोहित नेमकं काय म्हणाला…

maharashtra times

रोहित शर्मा आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे की, ” करोना व्हायरस हा आपल्या आयुष्यात एखाद्या वादळासारखा आला आणि त्यामुळे सर्व गोष्टी बाधित झाल्या आहेत. पण जर आपण या गोष्टीला सकारात्मकपणे पाहिले तर यामध्ये आपल्याला एक संदेश पाहायला मिळेल. आपण जर असा विचार केला की, धरणी माता चांगले ठेवण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात आहे. जर तुम्हाला चांगले आयुष्य जगायचे असेल तर तुम्ही निसर्गाला वाचवायला हवे. हाच संदेश या करोना व्हायरसच्या माध्यमातून आपल्याला सकारात्मकपणे घेता येऊ शकतो.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health workers in nashik: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा टक्का वाढणार – nashik local health system has decided to increase corona vaccination for heath workers

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण ११ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करवून घेण्याचे निर्देश आरोग्य सेवा संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे...

raksha khadse vs eknath khadse in raver: Raksha Khadse: एकनाथ खडसेंना आता सूनेचेच आव्हान; रक्षा खडसेंनी केला ‘हा’ निर्धार – raksha khadse challenges eknath...

जळगाव: माझ्या भूमिकेबाबत अनेकांच्या मनात शंका असली तरी कुठल्याही परिस्थितीत मी पक्ष सोडणार नाही व भाजपातच राहणार असल्याचे सांगत भाजप खासदार रक्षा खडसे...

Kaushal Inamdar: गाण्याचे लयतत्व हेच त्याचे प्राणतत्व – संगीतकार कौशल इनामदार – indian musical composer kaushal inamdar present various poems at marathi language conservation...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकवितेत म्हणण्यासारखे काही असावे. कधी कधी मुक्तछंदालाही आपली लय असते. ती लय संगीतकाराला सापडली तर गाणे होते. कुठल्याही गाण्याचे लयतत्व...

Recent Comments