Home संपादकीय ruturang diwali ank 2020: अंकलिपी : ऋतुरंग - review on ruturang diwali...

ruturang diwali ank 2020: अंकलिपी : ऋतुरंग – review on ruturang diwali ank ,mahanubhav ank, kishor diwali ank 2020


ऋतुरंग

साऱ्या जगाच्या करोनाशी सुरू असलेल्या लढाईच्या पार्श्वभूमीवर या वर्षी ‘लढत’ हे सूत्र घेऊन हा अंक गुंफला आहे. या लढतीचे पाच भाग आहेत. पहिल्या भागाची सुरुवात गुलजार यांच्या ‘धूप आने दो’ या लेखाने होते. करोना काळातल्या संमिश्र अनुभवांचे चित्रण यामध्ये आहे. अमिताभ बच्चन, मेलिंडा गेट्स यांच्या संघर्षाच्या नोंदी येथे वाचता येतात. हे भारतीय निवडणुकांचे शताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने राजकीय क्षेत्रातील जिंकलेल्या, हरलेल्या लढतींबद्दलचे मान्यवरांचे विशेष लेख आहेत. गेल्या आठ महिन्यांत अनेक पातळ्यांवर करोनाशी लढा सुरू आहे. ‘करोनाचे दिवस’ या भागामध्ये या संदर्भातील अनुभव आहेत. आयुष्मान खुराना, रणवीर सिंह, तापसी पन्नू अशा तारेमंडळींच्या लढाईचे क्षणही अंकात अनुभवता येतात. अंकभर विखुरलेली मान्यवरांची रेखाटने मजा वाढवतात.

संपादक : अरुण शेवते, पाने : २८०, किंमत : २५० रुपये

महाअनुभव

पाटा-वरवंट्याचे दिवस संपले; त्यामुळे तो व्यवसाय करणाऱ्यांवर जणू आभाळ कोसळले. त्यांची भुकेली भटकंती कासावीस करते. माती-माणसांवर प्रेम करणाऱ्या रानकवी ना. धों. महानोर यांनी त्याचा दाहक अनुभव ‘म्हादेव’मधून नोंदविला आहे. माणसे टिपणारा अवलिया म्हणजे अनिल अवचट. त्यांच्यावर सुहास कुलकर्णी यांनी ‘दोस्त गुरुजी – स्नेहाचे धागे आडवे उभे’ या शीर्षकाखाली लिहिले आहे. प्रदीप चंपानेरकर, प्रवीण दशरथ बांदेकर, मेघश्री दळवी यांच्या कथा, नितीन दादरावाला (बार्बरा डेव्हिडसन : अंधाऱ्या जगावरचा प्रकाशझोत), निरंजन घाटे (आयझॅक माऊली आणि मी), राजेश्वरी देशपांडे, अनिल परांजपे, डॉ. शंतनू अभ्यंकर, गौरी कानेटकर आदींचे लेख या अंकात आहेत.

मुख्य संपादक : सुहास कुलकर्णी, पाने : १८०, किंमत : २०० रुपये

किशोर

ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर (खरा वैज्ञानिक कोण?), प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर (दोन भूमिका), अनिल अवचट (भाषा गमतीची) हे लेख; संदीप खरे, दासू वैद्य, उत्तम कोळगावकर, माया धुप्पड, संतोष पवार, विजय चोरमारे आदींच्या कविता; त्याशिवाय जपानी, कोरिअन लोककथांचा अनुवाद हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच्यावरील परिचय लेख जसा प्रेरणादायी आहे, तसाच ‘डिप्रेशन… असलं काय नसतंय’ हा लेख आनंदाचा खजिना उघडणारा आहे.

कार्यकारी संपादक : किरण केंद्रे, पाने : १३०, किंमत : ६० रुपयेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

trp case: टीआरपीप्रकरणी मीडिया ट्रायल नको – bombay high court has directed news channel should not media trial in trp case

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले असताना, या खटल्यावर प्रभाव टाकणारे मीडिया ट्रायल वाहिन्यांकडून होऊ नये. त्यादृष्टीने...

Sourav Ganguly Announced 5 T 20 Match – करोना काळात हा संघ येणार भारत दौऱ्यावर; BCCIकडून घोषणा

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने...

Recent Comments