Home देश s400 missile delivery to india: क्षेपणास्त्र, दारुगोळा लवकर पाठवा; भारताची रशियाला विनंती...

s400 missile delivery to india: क्षेपणास्त्र, दारुगोळा लवकर पाठवा; भारताची रशियाला विनंती – india requests early delivery of missiles and ammunition from russia


नवी दिल्ली : क्षेपणास्त्र, दारुगोळा आणि असॉल्ट रायफलची डेलिव्हरी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी विनंती भारताने रशियाला केली आहे. आपत्कालीन खरेदी मार्गाद्वारे ही डेलिव्हरी करावी, अशी मागणी रशियाची राजधानी मॉस्कोला गेलेल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने केली. भारतीय सैन्याला अधिक मजबूत करणारा दारुगोळा लवकर देण्याबाबत रशियाने सकारात्मकता दाखवल्याची माहिती आहे. चीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाची सकारात्मकता अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते.

लडाख: गलवान खोऱ्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, मालेगावात शोककळा

सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या अमेठीत कालाश्निकोव्ह रायफल बनवण्याचा संयुक्त प्रकल्पही लवकर सुरू करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या पुढील समिटमध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ केला जाणं अपेक्षित आहे. या दोन्ही नेत्यांमधील पुढील समिट ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित आहे.

आणीबाणीची ४५ वर्षे: भाजपचा हल्लाबोल, मोदींचे ट्विट

भारताने ठराविक एस-४०० क्षेपणास्त्र, असॉल्ट रायफल आणि रशियन बनावटीचा दारुगोळा यांची मागणी तातडीने केली आहे. चीनविरोधातील संघर्ष वाढल्यास भारताला याची गरज पडू शकते, असा यामागचा विचार आहे. या महिन्यातच सरकारने तीनही सैन्य दलांना आपत्कालीन खरेदी अधिकार दिले आहेत. कोणत्याही आपत्कालीन स्थितीची गरज पूर्ण करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची खरेदी तातडीने करता येईल.

काश्मीर: सोपोरमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार; इंटरनेट सेवा बंद

भारताने विनंती केलेली शस्त्र लवकरात लवकर मिळतील, याची ग्वाही मिळाल्याचं राजनाथ सिंह यांनी रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरीसोव यांची भेट घेतल्यानंतर सांगितलं. रशियाकडून आपल्या सर्व प्रस्तावांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या चर्चेतून मी समाधानी आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले होते.

आपत्कालीन खरेदीशिवाय, अमेठीतील कारखाना दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. किंमतींवरुन मतभेद असल्यामुळे या कामासाठी अगोदरच जवळपास एक वर्षाने विलंब झाला आहे. हा प्रकल्पा पुढे नेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मूल्यमापन समितीची नियुक्ती केली आहे. ओएफबी म्हणजेच ऑर्डिनन्स फॅक्टरी मंडळ हा वादाचा केंद्रबिंदू होता. या बोर्डाकडून तंत्रज्ञान आणि निर्मितीसाठी जास्तीचा दर लावला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jayant patil on devendra fadanvis: अर्थसंकल्पावर फडणवीसांची टीका; राष्ट्रवादीने दिले ‘हे’ उत्तर – jayant patil on devendra fadanvis over maharashtra budget

हायलाइट्स:अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर केलाअर्थसंकल्पावरुन देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्रफडणवीसांना जयंत पाटलांनी दिलं उत्तरमुंबईः आज विधीमंडळात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला....

PM Modi: womens day pm modi : महिला दिनाला PM मोदींची जोरदार ऑनलाइन खरेदी, निवडणुका होत असलेल्या राज्यांतून घेतल्या वस्तू – womens day pm...

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ( womens day ) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( pm modi ) 'नारी शक्ती'ला सॅल्यूट केला आहे. भारताला स्वावलंबी...

Uddhav Thackeray On Maharashtra Budget 2021: Uddhav Thackeray: महाराष्ट्र मोठी भरारी घेईल!; मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला दिला ‘हा’ विश्वास – maharashtra will take a...

हायलाइट्स:कृषी, पायाभूत सुविधांची कामे तसेच उद्योग व गुंतवणुकीला अधिक चालना मिळणार.महाराष्ट्र येत्या वर्षात मोठी भरारी घेईल, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वास.करोना काळातही १...

Recent Comments