Home शहरं अहमदनगर sai baba temple shirdi: Sai Baba Temple Shirdi 'लॉकडाऊन' असताना 'ती' महिला...

sai baba temple shirdi: Sai Baba Temple Shirdi ‘लॉकडाऊन’ असताना ‘ती’ महिला साई मंदिरात; फेसबुक लाइव्ह केले! – despite the lockout a woman entered the sai temple


अहमदनगर: ‘ लॉकडाऊन ‘मुळे शिर्डी येथील साई समाधी मंदीर बंद असूनही एका महिलेने मंदीर परिसरात प्रवेश केला. प्रतिबंधित असलेल्या चावडी परिसरात जाऊन तेथे फोटो सेशन आणि फेसबुक लाइव्हही केले. त्यामुळे मंदीर परिसरात सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेण्यात येत नाही, अशी तक्रारी साईभक्त आणि माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे. ( Sai Baba Temple Shirdi )

दोन तीन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून फेसबुकच्या माध्यमातून माहिती मिळाल्याचे काळे यांनी सांगितले. संबंधित महिलेच्या पोस्टचे स्क्रीन शॉट्सही काळे यांनी काढून पाठविले आहेत. त्यावरून संबंधित महिलेने आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून दर्शन घेतल्याचे दिसून येते. काळे यांनी सांगितले की, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आदेशाने सर्व मंदिरे बंद करण्यात आली आली आहेत. मंदिरात केवळ नित्य स्वच्छता व दैनंदिन पूजा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असताना दोन दिवसांपूर्वी एक महिला भक्त शिर्डीत आली. ती थेट चावडीपर्यंत पोहचली. तिने दर्शन घेतले. तेथे या महिलेने फोटो सेशन केले, फेसबुक लाइव्हही केले. यासाठी किमान २० मिनिटांचा वेळ गेला असेल. तरीही मंदिरातील सुरक्षा कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांना कळले कसे नाही.

मंदिराची सुरक्षा व्यवस्था व पोलीस कोठे होते. सीसीसीटीव्हीद्वारे मंदिरावर लक्ष ठेवणारी यंत्रणा काय करीत होती. कोणीही मंदिरात प्रवेश करते, चित्रिकरण करून ते सोशल मीडियात व्हायरल करते आणि संस्थानच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पत्ताच लागत नाही, ही गोष्ट सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. कोणी दर्शन घेतले तर त्याला आपला अक्षेप नाही, मात्र जेव्हा सुरक्षेचा मुद्दा येतो, तेव्हा यंत्रणा कोठे असते, याकडे लक्ष वेधण्याचा माझा हेतु आहे, असेही काळे यांनी म्हटले आहे. मंदिराच्या सुरक्षेतील ढिसाळपणा यापूर्वीही अनेकदा उघडकीस आला आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेपाने कारवाई न होता प्रकरण दडपले जाते, अशी तक्रारही काळे यांनी केली आहे. याची गंभीर दखल घेऊन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, गुन्हे दाखल केले जावेत. लॉकडाऊनच्या काळातही पगार सुरू असलेल्यांनी सुरक्षेचे काम तरी चोख करावे, अशी भक्तांची अपेक्षा असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. रामनवमी दिवशीही सुरक्षा उपायांचा भंग झाला होता. त्याससंबंधी आपण केलेल्या तक्रारीवर अद्याप कारवाई झालेली नाही, असे काळे यांचे म्हणणे आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: Kangana Ranaut : कंगना रनौट होणार मुंबई पोलिसांसमोर हजर; हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश – bombay high court grants interim protection from arrest...

मुंबई: अभिनेत्री कंगना रनौट आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांना मुंबई हायकोर्टाने आज झालेल्या सुनावणीवेळी दिलासा दिला आहे. त्यांना सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत अटक...

covid 19 norms in aurangabad: विनामास्क फिरणाऱ्यांकडून ३९ लाखांवर दंड वसूल – more than 39 lakh fine recovered from who violate covid 19 norms...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादविनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्यासात महिन्यांत सात हजार ८६५ नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ३९...

Nashik News : मुंबईच्या वाहनांना सातपूरचा पर्याय – transport on the flyover from dwarka to meenatai thackeray stadium will be closed soon in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकद्वारका ते मीनाताई ठाकरे स्टेडियम या भागातील उड्डाणपुलावरील वाहतूक लवकरच बंद करण्यात येणार आहे. के. के. वाघ महाविद्यालय ते...

Recent Comments